धक्कादायक! एलिफंटाला ८० प्रवाशांना घेऊन जाणारी बोट बुडाली…

मुंबई : गेट वे ऑफ इंडियापासून एलिफंटाकडे जाणारी नीलकमल नावाची एक प्रवासी बोट बुडाल्याची घटना मुंबईत घडली. या बोटीत सुमारे 80 प्रवासी होते. त्यापैकी 77 प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे. तर तीन प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. घटनास्थळी बचाव कार्य पूर्ण झाले आहे.

एलिफंटाकडे जात असताना उरण, कारंजाजवळ ही दुर्घटना घडली आहे. समोरून येणाऱ्या इंडियन नेव्हीच्या स्पीड बोटीने जोरदार धडक दिल्याने प्रवाशांना घेऊन जाणारी ही बोट बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघाताची दृश्य ही कॅमेरात कैद झाली आहेत. त्यामध्ये एक स्पीड बोट ही आधी मोठा राऊंड मारताना दिसत आहे. नतंर ही स्पीड बोट नीलकमल या बोटीला समोरून धडक मारते. धडक मारणारी ही स्पीड बोट इंडियन नेव्हीची असल्याचे सांगितले जात आहे. ही बोट नेव्हीची असल्याची माहिती मिळाल्यानंतर इंडियन नेव्हीकडून त्याची चौकशी सुरू झाली आहे.

घटनास्थळी बचाव कार्य पूर्ण झालं असून 77 प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे. तर तिघांचा मृत्यू झाला आहे. मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियापासून घटनास्थळ जे समुद्रात जवळपास 10 किमी अंतरावर आहे.

खांबोली तलावात फर्ग्युसन महाविद्यालयाचे दोन विद्यार्थी बुडाले

हृदयद्रावक! जळगावमध्ये तीन मुलांचा धरणात बुडून मृत्यू…

उजनी धरणात बोट उलटल्याने पाच जण बुडाले…

हृदयद्रावक! एकमेकांना मिठी मारल्याने चौघांचा बुडून मृत्यू…

अहमदनगर जिल्हा हादरला! मांजरीमुळे एकाच कुटुंबातील सहा जण बुडाले…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!