
पुणे! वडिलांना ‘टकल्या’ म्हणाला म्हणून दगडाने ठेचून केला खून…
पुणे: वडिलांना ‘टकल्या’ म्हणल्याच्या राग आल्यानंतर अल्पवयीन मुलाने एका व्यक्तीचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना वाघोली परिसरात घडली आहे. राजू लोहार (वय 46) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी 16 वर्षीय अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आरोपी मुलगा आणि खून झालेली व्यक्ती हे दोघेही एकमेकांच्या ओळखीचे आहेत. वाघोलीतील दरेकर वस्ती परिसरातील राहिवासी आहेत. दोघेही मद्यप्राशन करण्यासाठी बसले होते. दरम्यान, त्यांच्यामध्ये किरकोळ कारणावरुन वाद सुरु झाला. वडिलांना टकल्या म्हटल्याचा राग आल्याने अल्पवयीन मुलाने राजू लोहार याला मारहाण करण्यास सुरुवात केली. शेजारी असलेल्या दगडाने राजू लोहारला बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये राजू लोहार याचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, खून झाल्याची घटना समोर आल्यानंतर वाघोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दारूच्या नशेत असलेल्या अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मृत्यू झालेल्या राजू लोहार यांच्या मुलाने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
मुळशी हळहळली! विवाहापूर्वी पैलवानाचा हृदयविकाराने मृत्यू…
पुणे शहरात घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास केले जेरबंद…
पुणे! लिव्ह इनमधील प्रेयसीच्या खूनाचे कारण सांगितले आरोपीने…
धक्कादायक! पुणे शहराजवळ कोयत्याने सपासप वार करुन एकाची हत्या…
Video: पुणे ग्रामीण पोलिसांनी स्मशानभुमी मधील लाकडावरुन उघड केला खुनाचा गुन्हा…



