पुणे शहरात घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास केले जेरबंद…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास विश्रांतवाडी पोलिस स्टेशनचे तपास पथकाने जेरबंद केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

विश्रांतवाडी पोलिस स्टेशन गुन्हा रजि. नंबर ३८०/२०२४, भा.न्या.स. कलम ३३१(३). ३३१(४),३०५(अ), ३(५) प्रमाणे दाखल घरफोडीतील पाहिजे असलेला गुन्हेगार महेश चव्हाण याचा शोध विश्रांतवाडी पोलिस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार घेत होते. तपास पथक प्रमुख नितीन राठोड यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली सदरचा गुन्हेगार हा हडपसर गंगानगर येथे त्याचे मित्रांसह थांबलेला आहे. खात्रीशीर बातमी मिळाल्याने तपास पथकाचे अधिकार नितीन राठोड व तपास पथकाचे अंमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन सापळा रचला. आरोपी महेश काशिनाथ चव्हाण (वय १९ वर्षे रा. बंटर स्कूलचे मागे, हडपसर) पुणे यास पकडून त्याच्याकडे गुन्हया बाबत तपास करुन त्याच्याकडून गुन्हयात चोरीस गेलेला किं.रु.२६१०००/-रु. चे सोन्याचे दागिने व मोटार सायकल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीकडून विश्रांतवाडी पोलिस स्टेशनकडील घरफोडीचे दोन गुन्हे व कोंढवा पोलिस स्टेशन येथील वाहन चोरीचा एक गुन्हा उघड करण्यात आला असून, आरोपीची न्यायालयाने येरवडा कारागृहात रवानगी केली आहे.

सदरची कामगिरी मनोज पाटील, अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, हिंम्मत जाधव, पोलिस उप-आयुक्त परिमंडळ ४, पुणे शहर, अनुजा देशमाने, सहा. पोलिस आयुक्त, खडकी विभाग, पुणे, कांचन जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्रांतवाडी पोलिस स्टेशन पुणे, मंगेश हांडे, पोलिस निरीक्षक (गुन्हे), विश्रांतवाडी पोलिस स्टेशन पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी नितीन राठोड, पोलिस उप निरीक्षक, पोलिस अंमलदार बबन वणवे, यशवंत किर्वे, कृष्णा माचरे, अमजद शेख, वामन सावंत, संजय बादरे, संपत भोसले, संदीप देवकाते, अक्षय चपटे, किशोर भुसारे यांनी केली आहे.

पुणे शहरात पेट्रोल चोरी केल्याच्या संशयावरून मारहाण केलेल्या युवकाचा मृत्यू…

पुणे! लिव्ह इनमधील प्रेयसीच्या खूनाचे कारण सांगितले आरोपीने…

Video: पुणे शहरात लाखो रुपयांचे अंमली पदार्थ व पिस्टल जप्त…

धक्कादायक! पुणे शहराजवळ कोयत्याने सपासप वार करुन एकाची हत्या…

पुणे पोलिसांनी चुहा गँगचा कुख्यात टोळीप्रमुख व त्याच्या साथिदारांना हत्यारांसह केले जेरबंद…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!