EVM मशीन फोडल्या प्रकरणी 40 जणांवर गु्न्हे दाखल…

बीड: विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी परळी मतदार संघातील घाटनांदूर येथे मतदान केंद्रावर तोडफोडीची घटना घडली होती. ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट मशीनची तोडफोड केल्या प्रकरणी जवळपास 40 जणांवर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात अतिशय गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

महाविकास आघाडीचे नेते ऍड. माधव जाधव यांना कन्हेरवाडी येथे मारहाण करण्यात आली. व्हिडीओ व्हायरल होताच या मारहाणीचे पडसाद संपूर्ण मतदार संघात उमटले. यावेळी मतदान केंद्राची तोडफोड आणि कर्मचाऱ्याला सुद्धा मारहाण झाल्याची तक्रार देण्यात आली आहे आणि यानूसार चाळीस जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माधव जाधव यांना मारहाण झाल्यानंतर त्याचे पडसाद घाटनांदुर या ठिकाणी उमटले. मतदान केंद्र मध्ये तोडफोड झाली. या प्रकरणी 40 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि याच घटनेच्या निषेधार्थ आज घाटनांदुर बंद ठेवण्यात आलेले आहे. आज (गुरुवार) सकाळपासून मधील दुकाने उघडलेली नाहीत. कालच्या घटनेनंतर पोलिसांनी दाखल केलेल्या तरुणावरील गुन्ह्याच्या निषेधार्थ आज घाटनांदुर बंद आहे.

कराळे मास्तरांना भर रस्त्यात कॉलर पकडून मारहाण…

आज तुझा मर्डर फिक्स! सुहास कांदे यांची समीर भुजबळ यांना धमकी…

पुणे शहरात शरद पवार गटाचा नेत्यावर भरदुपारी हल्ला…

विरार प्रकरण! भाजपचे विनोद तावडे, राजन नाईक यांच्या विरोधात गुन्हा दाखल…

अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला प्रकरणात पोलिसांची कारवाई…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!