
पुणे जिल्ह्यातील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला बंडगार्डन पोलिसांनी केले जेरबंद…
पुणेः खेड पोलिस स्टेशन हद्दीमध्ये केलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला बंडगार्डन पोलिसांनी जेरबंद केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
बंडगार्डन पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड/ पोलिस निरीक्षक गुन्हे संपतराव राऊत यांच्या आदेशाने विधानसभा निवडणूक अनुषंगाने पोस्टे हद्दीमध्ये PSI धीरज गुप्ता, थ्रेपोउनि काळे, पोशि/९८६७ बडे पोशि/ १२००३ भोकरे, पोशि/10253 संकपाळ असे पोलिस स्टेशन हदीत पेट्रोलिंग करत होते. १४/११/२०२४ रोजी सकाळी ०९/३० वा चे सुमारास ससुन हॉस्पिटल जवळ एक व्यक्ती संशास्पद अवस्थेत दिसून आला. स्टाफचे मदतीने थांबवून नाव पत्ता विचारला. सलमान अबुलगणी शेख (वय – २३, व्यवसाय- मजुरी, सलमान सोफा फर्निशिंग, वडगाव रोड. आळंदी, पुणे मुळ रा- मु.पो.अलिपुर बजार) असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे विचारपुस करता त्याने उडवाउडवीचे उत्तरे देण्यास सुरुवात केल्याने त्यास वरील स्टाफचे मदतीने पोलिस स्टेशन येथे आणले. त्यास विश्वासात घेवून त्याचेकडे सखोल चौकशी करता त्याने ०३/ ११/२०२४ रोजी रात्रो ०८/०0 वा चे सुमारास चाकण ते खेड दरम्यान खरपुडी फाटा येथे त्याचा मित्र शरद गायकवाड याचा चाकुने खुन केल्याचे सांगितले. त्याबाबत खेड पोलिस स्टेशन पुणे ग्रामिण येथे संपर्क करुन माहिती घेतली असता खेड पोलिस स्टेशनखेड पोलिस स्टेशन येथे गु.र.नं.620/ 2024 भा.न्या.सं.कलम १०३(१) प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर आरोपी हा फरारी असल्याची खात्री झाली. पोलिस स्टेशन चे सपोनि प्रदिपसिंग सिसोदे यांचे ताब्यात आरोपीला सुखरुप देण्यात आले आहे
सदरची कारवाई अप्पर पोलिस आयुक्त पश्चिम विभाग पुणे शहर प्रवीणकुमार पाटील, पोलिस उपायुक्त परिमंडळ 2 स्मार्तना पाटील, साहाय्यक पोलिस आयुक्त लष्कर विभाग दीपक निकम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांचे पोलिस निरीक्षक गुन्हे संपतराव राऊत मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलिस उपनिरीक्षक धीरज गुप्ता, पोलिस उपनिरीक्षक स्वप्निल लोहार, पोलिस उपनिरीक्षक प्रदीप शितोळे ,मोहन काळे ,पो.शि महेश जाधव, ज्ञाना बडे, शिवाजी सरक, मनोज भोकरे, मनीष संकपाळ यांचे पथकाने सदरची कारवाई केली आहे.
पुणे शहरात सापडला कुत्र्यांनी अर्धवट खाल्लेला मृतदेह…
पुणे शहरात अट्टल घरफोडी करणाऱ्या पाहिजे आरोपीस पोलिसांनी केली अटक…
पुणे शहरात मॉर्निंग वॉक करताना पत्ता विचारण्याचा बहाना करून चैन चोरणारा ताब्यात…
पुणे शहरातील तडीपार आरोपीस दरोडा व वाहन चोरीच्या पथकाने घेतले ताब्यात…
पुणे शहरात रेकार्डवरील सराईत गुन्हेगारास पिस्टल व काडतुसह युनिट २ कडून जेरंबद…

