धक्कादायक! मूल होत नसल्याने भोंदूबाबासह दिराने केला सामूहिक बलात्कार…

सांगली : मूल होत नसल्यामुळे अंधश्रद्धेतून सासरच्या मंडळींनी विवाहितेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुद्धीकरणाच्या नावाखाली पती, दीरासह एका भोंदूबाबाने सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली असून, या प्रकरणी पीडितेने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर तिघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी काशीनाथ रामा उगारे या भोंदूबाबासह पीडितेचा पती आणि दिराला सामूहिक बलात्कार प्रकरणी अटक केली आहे. पीडित युवतीचा एका सुशिक्षीत कुटुंबातील युवकासोबत विवाह झाला होता. पण मूल होत नसल्याने सासरच्या मंडळींनी तिचा छळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अंधश्रद्धेतून घरात बुवा, बाबांकडून पूजा केली जात असे. बुवाचे पाय धुवून पाणीही प्यायला लावले जात होते.

काही महिन्यापूर्वी गाडीने जात असताना वाटेत गाडी बंद पडली. त्यावेळी सासरच्या लोकांनी भोंदूबाबा काशीनाथ उगारे याला फोन केला. त्याने पीडितेच्या कुटुंबियांना तुमची सून अपशकुनी असल्याचे सांगून दुसऱ्याच दिवशी धार्मिक विधीसाठी कुटुंबियांना तयार केले.

भोंदूबुवा पीडितेच्या घरी आला. तिथे पूजेचे विधी केल्यानंतर पीडितेला अंघोळ करण्यास सांगितले. त्यानंतर शुद्धीकरण करायचे असं सांगून पती, दीर आणि भोंदूबाबाने पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. या प्रकारानंतर पीडितेला मोठा धक्का बसला. माहेरी गेल्यानंतर ती नैराश्यात होती. कुटुंबियांनी विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर तिने घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला. यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस पुढील तपास करत आहेत.

धक्कादायक! नवऱ्यासमोर महिलेवर ५ जणांकडून सामूहिक बलात्कार…

मुंबईत CSMT परिसरात महिलेवर सामूहिक बलात्कार…

संतापजनक! सामूहिक बलात्कारातील पीडित मुलीवर पुन्हा बलात्कार अन्…

संतापनजक! प्रेमविवाहानंतर मित्रांना बोलवून पत्नीवर सामूहिक बलात्कार अन्…

युवतीवर पाच जणांकडून सामूहिक बलात्कार; व्हिडिओ व्हायरल…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!