
पुणे शहरात रेकार्डवरील सराईत गुन्हेगारास पिस्टल व काडतुसह युनिट २ कडून जेरंबद…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात रेकार्डवर असलेल्या सराईत गुन्हेगारास पिस्टल व काडतुसह युनिट २ने जेरंबद केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने १७/१०/२०२४ रोजी गुन्हे शाखा युनिट २ कडील अधिकारी व अंमलदार हे युनिट २ चे हददीमध्ये पेट्रोलिंग करीत होते. पोलिस हवालदार उज्वल मोकाशी व शंकर कुंभार यांना बातमी मिळाली की, डायसप्लॉट गुलटेकडी स्वारगेट पुणे येथील कॅनलाजवळ एक व्यक्ती अग्निशस्त्र घेवून थांबलेला आहे. त्याप्रमाणे युनिट २ प्रमुख पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांना माहिती दिली. त्यांनी कायदेशीर करावाई करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे युनिट २ कडील सपोनि अमोल रसाळ व त्याचे पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे डायसप्लॉट गुलटेकडी स्वारगेट पुणे येथील कॅनल जवळून १८/०० वा. सुमारास सज्जन सुनिल जाधव (वय १९ वर्ष रा. डांगे चौक पिंपरी गांव पुणे मुळ रा. रेणुशीमोरा महाबळेश्वर सातारा) याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याचेकडे ५०,४००/- रु. एक सिल्व्हर रंगाचे लोखंडी पिस्टल मॅगझीनसह व एक जिवंत काडतुस मिळून आले. त्याबाबत स्वारगेट पोलिस स्टेशन पुणे येथे गुन्हा रजि. कमांक ४४७ / २०२४ भारताचा हत्याराचा कायदा कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयात आरोपीस गुन्हयात अटक करुन त्याची पोलिस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे. अधिक तपास चालु आहे.
सदरची कामगिरी अपर पोलिस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे, पोलिस उप आयुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहायक पोलिस आयुक्त गुन्हे १ गणेश इंगळे यांचे मागदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ कडील पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, सपोनिअमोल रसाळ, सपोनि अशिष कवठेकर, पोउपनिरी नितीन कांबळे, पोलिस हवालदार शंकर नेवसे, उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, निखिल जाधव, साधना ताम्हाणे, पुष्पेद्र चव्हाण, विनोद चव्हाण, ओम कुंभार, हनुमंत काबंळे, गणेश थोरात, विजय पवार, राहुल शिंदे अमोल सरडे व नागेश राख यांनी केली आहे.
पुणे शहरात बाणेर टेकडीवर महिलांना जबरदस्तीने लुटणारी टोळी जेरबंद…
पुणे शहरातील फरासखाना पोलिसांनी आरोपींना पाठलाग करून केली अटक; पाहा गुन्ह्याची पद्धत…
पुणे शहरात खोक्यात सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली; कारण समोर…
पुणे शहरात एकाला नकली नोटांसह सहकारनगर पोलिसांनी केले जेरबंद…
Video: पुणे पोलिसांनी कर्नाटकमध्ये जाऊन जीवावर उदार होत अपहरण कर्त्यांची केली सुटका…

