
हृदयद्रावक! शिक्षिकेने उदार मनाने आपल्या यकृताचा काही भाग केला दान अन्…
बंगळुरू (कर्नाटक): बंगळुरूमधील शिक्षिका अर्चना कामत (वय ३३) नावाच्या महिलेने नवऱ्याच्या मावशीला आपल्या यकृताचा काही भाग दान केला होता. मात्र या शस्त्रक्रियेनंतर काही समस्या उद्भवल्यामुळे काही दिवसांतच तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
अर्चना कामत यांच्यावर ४ सप्टेंबर रोजी शस्त्रक्रिया झाली होती. यकृताचा भाग दान केल्यानंतर पुढचे सात दिवस त्या रुग्णालयातच उपचार घेत होत्या. उपचारानंतर घरी सोडण्यात आले. मात्र, घरी गेल्यानंतर अर्चना यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे संसर्ग झाल्यामुळे अर्चना कामत यांचा मृत्यू झाला. अर्चना कामत यांना चार वर्षांचा मुलगा आहे. त्यांचा पती सनदी लेखापाल असून त्या स्वतः शिक्षिका होत्या.
अर्चना यांच्या पतीची मावशी अनेक वर्षांपासून आजारी असून त्या १८ महिने यकृत दान करणाऱ्या व्यक्तीच्या शोधात होत्या. त्यामुळे अर्चनाने पुढाकार घेऊन त्यांना यकृताचा भाग दान करण्याचा निर्णय घेतला होता. बंगळुरूच्या सेवांजली चॅरिटेबल ट्रस्ट रुग्णालयात अर्चना कामत यांनी अखेरचा श्वास घेतला असून, त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
धक्कादायक! नवरा म्हणायचा; मला आवडत नाहीस, तुझे अनैतिक सबंध…
हृदयद्रावक! गर्भवती असल्याची गुडन्यूज मिळाली अन् नको ते घडलं…
हृदयद्रावक! पुणे जिल्ह्यात नवविवाहित दांपत्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू…
हृदयद्रावक! आईच्या शरीराला बांधलेले चिमुकल्यांचे मृतदेह तलावात आढळले…
हृदयद्रावक! रक्षाबंधनाला माहेरी आली अन् अंधारात नको ते घडलं…

