Video News: PoliceKaka Top 10 Crime News…

नमस्कार,
पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी…

लोणावळा येथील भुशी डॅमवर आलेलं पुण्यातील कुटुंब गेलं वाहून
पुणेः पुणे शहरातील अन्सारी कुटुंब वर्षाविहारासाठी लोणावळ्यातील भुशी डॅमवर गेले होते. रेल्वे वॉटर फॉलवर पर्यटनाचा आनंद घेताना त्यांचा तोल जाऊन ते धबधब्यात पडले. सर्वांनी एकमेकांना आधार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याच्या प्रवाहात 5 जण वाहून गेले. त्यातील तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. महिला आणि दोन मुलांचा मृतदेह सापडला असून, इतर 2 मुलांचा शोध सुरू आहे.

बारामती येथील रणजित निंबाळकर हत्या प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
बारामतीः बारामती तालुक्यात सुंदर नावाच्या बैलाच्या व्यवहारातून निंबाळकर आणि काकडे यांच्यात वाद झाला होता. यातून रणजित निंबाळकर यांच्यावर गोळीबार झाला होता. घटनेनंतर गौतम काकडे फरार झाले होते. रणजीत निंबाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर गौतम काकडे यांना पोलिसांनी अटक केली.

पोलिस भरतीदरम्यान मैदानी चाचणी देताना उमेदवाराचा मृत्यू
मुंबईः नवी मुंबईत पोलिस भरतीदरम्यान तळोजा ग्राउंडवर धावताना एका युवकाचा मृत्यू झाल्याची घडना घडली आहे. अक्षय मिलिंद बिऱ्हाडे (वय २५, रा. अमळनेर) असे मृत युवकाचे नाव आहे.

मोबाईलवरील लिंकला क्लिक केले अन् शेतकऱ्यांचे लाखो रुपये गायब
हिंगोली : पीएम किसान अ‍ॅपच्या लिंकवर क्लिक करताच शेतकऱ्यांचं बँक खातं रिकामे झाले आहे. वसमत तालुक्यातील गिरगाव मधील जवळपास 7 शेतकऱ्यांना या लिंकवर क्लिक करणे चांगलेच महागात पडले आहे.

विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
मुंबईः पत्र्यावर पडलेला बॉल काढण्यास गेलेल्या 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गोरेगाव येथे घडली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

आईने केला मुलासह आत्महत्येचा प्रयत्न केला; आईचा मृत्यू
चंद्रपूरः वरोरा तालुक्यातील शेगाव येथे कुटुंबियांच्या त्रासाला कंटाळून महिलेने मुलासह आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत पल्लवी पारोधे (वय २७) या आईचा मृत्यू झाला असून, बाळ बचावले आहे.

दोघांचा खून करुन फरार आरोपींना जळगावमध्ये अटक!
जळगाव : गुजरातमधील दोन सराईत गुन्हेगारांना जळगाव ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले आहे. सुपारी घेऊन सुरतमध्ये दोघांचा खून करुन फरार झाले होते. 16 लाख रुपयांची सुपारी घेऊन दोघांचा खुन केल्याची कबुली दिली आहे. एका आरोपीवर पाच खुनाचे गुन्हे तर दुसऱ्या ओरीपीवर 15 खुनाचे गुन्हे दाखल आहेत.

बीडमध्ये सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
बीडः बीडमध्ये सरपंचावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेत दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. बापू आंधळे असे मृत्युमुखी पडलेल्या सरपंचाचे नाव असून, ते मरळवाडी या गावचे सरपंच होते.

लातूरमध्ये वसतीगृहाच्या इमारतीवरुन मुलीची उडी; उपचारादरम्यान मृत्यू
लातूर : लातूर येथील वसतीगृहात राहणाऱ्या सायली सिद्धार्थ गायकवाड (वय 15) हिने मुलीने वसतीगृहाच्या इमारतीवरुन उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. ही आत्महत्या नव्हे तर, घातपात आहे, अशी शंका नातेवाईकांकडून व्यक्त करण्यात आली.

आनंदवनातील युवतीच्या खून प्रकरणातील आरोपीची पोलिस कोठडीत आत्महत्या
चंद्रपूर: बाबा आमटे यांच्या आनंदवन प्रकल्पात एका महिलेचा खून झाला झाल्यानंतर पोलिसानी आरोपी समाधान माळी (वय 25) याला अटक करून त्याची रवानगी पोलिस कोठडीत केली होती. वरोरा पोलिस स्टेशनच्या लॉकअप मध्ये त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

policekaka-special-offer

पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) आबिद सय्यद : पोलिस दलासोबत जिव्हाळ्याचे नातं!
२८) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!