Video: पोलिसकाका क्राईम ताज्या घडामोडी….

नमस्कार,
पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी…

पुणे पोर्शे हिट अँड रन प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
मुंबई : पुणे पोर्शे हिट अँड रन प्रकरणातील मृत्यूमुखी पडलेला युवक आणि युवतीच्या वडिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी येऊन भेट घेतली. यावेळी दोषींवर कठोरात कठोर करवाई व्हावी यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक चालवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

पुणे शहरात दोन युवती ड्रग्ज ओढताना सापडल्या
पुणे : पुणे शहरातील एफसी रोडवरील हॉटेलमधला ड्रग्जचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोन युवती ड्रग्ज सेवन करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. शौचालयामध्ये या दोन युवती ड्रग्ज सदृष्य पदार्थ घेताना दिसत आहेत.

पुणे शहरातील ड्रग्ज प्रकरणी मोठी कारवाई
पुणे : पुणे शहरातील ड्रग्स पार्टी प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाचे पोलिस निरीक्षक व्ही बी बोबडे यांना निलंबित करण्यात आले आहे. कर्तव्यात कसून केल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

लातूरमध्ये नीट पेपर फुटी प्रकरणात दुसरी अटक
लातूर : नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी संजय जाधव याला पोलिसांना पकडण्यात यश आले आहे. पेपर फुटी प्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.

पंकजा मुंडे यांच्या बाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक
परभणी : परभणी पोलिसांनी पंकजा मुंडे यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकाला अटक केली आहे. सदरील आरोपीने इन्स्टाग्रामवर पंकजा मुंडे यांच्याविषयी अत्यंत अश्लील शब्दांत एक प्रतिक्रिया टाकली होती.

वर्धा येथे भर रस्त्यात 5 वेळा डोक्यात घालत घेतला जीव
वर्धा : वर्धा येथील सोनेगाव मार्गावर दिवसाढवळ्या भररस्त्यात एका व्यक्तीच्या डोक्यात 5 वेळा दगड घालून हत्या करण्यात आली. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेत 2 महिलाही जखमी झाल्या आहेत. आरोपीला पोलिसांनी घटनास्थळावरुनच ताब्यात घेतले आहे.

रायगड जिल्ह्यात पत्नीने केला पतीचा खून
रायगड : जिल्ह्यातल्या खोपोली शहरातील पटेलनगर भागात एका महिलेने चक्क पतीलाच संपवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे.

ठाणे जिल्ह्यात दुखणं मुलाच्या पायाचं; ऑपरेशन केलं गुप्तांगाचं
ठाणे : ठाणे जिल्ह्यात पाय दुखत असल्यामुळे रुग्णालयात गेलेल्या 14 वर्षांच्या मुलाचं गुप्तांगाचे ऑपरेशन केल्याचा धक्कादायक प्रकार ठाणे जिल्ह्यातल्या शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये घडला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात एकाच महिलेवर 4 वेगवेगळ्या ठिकाणी चौघांकडून अत्याचार
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात एका महिलेसोबत चार जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना यळगुड येथून समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे.

दिल्लीमध्ये मुलीच्या मृत्यूनंतर आईने घरात खड्डा घेऊन पुरला मृतदेह
नवी दिल्ली : सुमारे 10 महिन्यांपूर्वी एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यानंतर कुटुंबीयांनी घराच्या आतील खोलीत खड्डा खणून तिचा मृतदेह पुरला होता. पोलिसांनी फरशी तोडून अल्पवयीन मुलाचा सांगाडा जप्त केला आहे.

policekaka-special-offer

पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) आबिद सय्यद : पोलिस दलासोबत जिव्हाळ्याचे नातं!
२८) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!