
युवती झाडू काम करून उपजिल्हाधिकारी झाली अन् आता अटक…
जयपूर (राजस्थान): एका युवतीने जोधपूर महापालिकेत रस्त्यावर झाडू मारण्याचे काम करत असतानाच अभ्यास करून उपजिल्हाधिकारी झाली. नागरिकांनी अभिनंदननाचा वर्षाव केला होता. पण, उपजिल्हाधिकारी म्हणून काम करत असताना लाच घेताना पकडल्यानंतर अटक करण्यात आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
रस्त्यावर झाडू मारणारी आशा कंडरा 2021 मध्ये उपजिल्हाधिकारी बनून चर्चेत आल्या होत्या. राजस्थान प्रशासकीय सेवा परीक्षा (RAS) 2018 च्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल खूप कौतुक झाले. सध्या जयपूरमध्ये तैनात असलेल्या आशा कंडरा यांना 12 जूनच्या रात्री राजस्थान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) 1 लाख 75 हजार रुपयांची लाच घेताना पकडले. ती सफाई कामगारांच्या भरतीसाठी लोकांकडून पैसे घेत असल्याची माहिती एसीबीला मिळाली होती.

आशा कंडरा 1997 मध्ये 12वी उत्तीर्ण झाल्या होत्या. यानंतर त्यांनी आपले शिक्षण सोडले आणि वडिलांच्या सांगण्यावरून 2013 मध्ये पुन्हा अभ्यास सुरू केला आणि बीए केले. यानंतर, 2018 मध्ये RAS 2018 फॉर्म भरला. आशा RAS 2018 च्या प्रिलिम्स, मेन आणि मुलाखतीसाठी गेल्या. मात्र निकालासाठी दोन वर्षे वाट पाहावी लागली. यावेळी कुटुंबाला मदत करण्यासाठी त्यांनी जोधपूर महापालिकेत स्वच्छता कर्मचारी पदासाठी अर्ज केला. या पदावर निवड झाली. सतत दोन वर्षे ती काम करत राहिली. RAS चा निकाल फेब्रुवारी 2021 मध्ये आला. ज्यामध्ये त्यांची उपजिल्हाधिकारी पदासाठी निवड झाली. आशा कंडारा यांनी राजस्थान प्रशासकीय सेवेत 728 वा क्रमांक पटकावला होता.
आशा कंडारा यांनी सांगितले होते की, ‘वडील राजेंद्र कंडारा फर्टिलायझर कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये अकाउंट ऑफिसर होते आणि आई कुटुंब सांभाळत असे. मात्र संयुक्त कुटुंब आणि सामाजिक दबावामुळे बारावीनंतर लग्न झाले आणि वयाच्या 32 व्या वर्षी घटस्फोटही झाला. त्यावेळी ती दोन मुलांची आई होती.’
शेतकऱ्याकडून लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याच्या घरात मिळालं घबाड…
लाचखोर पोलिस निरीक्षकाच्या घरात सापडलं मोठं घबाड…
Video: ‘एसीपी’साठी लाखाची लाच घेणारा अडकला ‘एसीबी’च्या जाळ्यात…
रेल्वे अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले अन् सापडले मोठे घबाड…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

