पुणे शहरात मध्यरात्री पार्टी करून जात असलेल्या युवकाने घेतला २ जणांचा जीव…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात मध्यरात्री पार्टी करून जात असलेल्या युवकाने भरधाव वेगात मोटार चालवून दुचाकीला धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात दुचाकीवरील युवक आणि युवतीचा जागीच मृत्यू झाला आहे.

पुणे-नगर महामार्गावील कल्याणीनगर जंक्शन चौक येरवडा येथे शनिवारी (ता. १८) मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली आहे. अकिब रमजान मुल्ला (वय २४) यांनी याबाबत येरवडा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.  धक्कादायक म्हणजे तो चालवत असलल्या बीएमडब्ल्यू या मोटारीला नंबरप्लेट नाही.

फिर्यादी हे त्यांच्या मित्रांच्या सोबत बॉलर हॉटेलमध्ये पार्टी करुन घरी परत जात होते. कल्याणीनगर-एअरपोर्ट रोडवर ग्रे कलरच्या बीएमडब्ल्यू गाडी ने दोन्ही बाजूस नंबरप्लेट नसलेल्या कार चालकाने त्याच्या ताब्यातील चारचाकी गाडी हयगयीने, निष्काळजीपणाने, भरधाव वेगाने, बेदरकारपणे अनिस अवधिया याच्या दुचाकीला (एम.एच. १४ सी क्यु ३६२२) हिला पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात अनिस अवधिया व मैत्रीण अश्विनी कोस्टा यांचा मृत्यू झाला आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, १९/०५/२०२४ रोजी रात्री ०२:३० वा. चे सुमारास आम्ही वरील मित्रांनी बॉलर हॉटेलमध्ये पार्टी करुन घरी परत जात असताना कल्याणीनगर, पुणे येथील लॅन्डमार्क सोसायटी जवळ कल्याणीनगर-एअरपोर्ट रोडवर ग्रे कलरच्या दोन्ही बाजूस नंबरप्लेट नसलेल्या पोर्शे कार चालकाने त्याचे ताब्यातील चारचाकी गाडी हयगयीने, निष्काळजीपणाने, भरधाव वेगाने, बेदरकारपणे तसेच मानवी जिवीतास हानी पोहचेल अशा स्थितीत चालवून, वाहतूकीचे नियमांकडे दुर्लक्ष करुन, माझा मित्र अनिस अवधिया याचे बजाज पल्सर गाडी नं. एम.एच. १४ सी क्यु ३६२२ हिस पाठीमागून जोरात धडक देवुन, पल्सर गाडीचे व रस्त्यालगत पार्क झालेल्या वरील दोन्ही गाड्यांचे नुकसान करून सदर पल्सर गाडीवरील माझा मित्र अनिस अवधिया व मैत्रीण अश्विनी कोस्टा यांचे मृत्यूस कारणीभुत झाला म्हणून तक्रार आहे.

दरम्यान, येरवडा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, याबाबतचा पुढील तपास विश्वनाथ तोडकरी, सहाय्यक पोलिस निरीक्षक येरवडा पोलिस स्टेशन पुणे हे करीत आहेत.

पुणे शहरात ‘रात्रीस खेळ चाले’; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…

Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…

Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…

पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!