वऱ्हाडाच्या स्कॉर्पिओवर खडीचा हायवा पटली; सहा जणांचा मृ्त्यू…

पाटणा (बिहार) : बिहारच्या भागलपूर कहलगाव मुख्य मार्गावर आमापूर परिसरामध्ये सोमवारी रात्री साडेआकराच्या सुमारास वऱ्हाडाच्या गाडीवर खडीची वाहतूक करणारा हायवा पलटी झाला. या अपघातामध्ये स्कॉर्पिओमध्ये असलेल्या सहा जणांचा जागीच मृ्त्यू झाला आहे. तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिकांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!

अपघाताची माहिती मिळताच घोघा पोलिस ठाण्याचे पोलिस अपघातस्थळी पोहोचले. त्यांनी जेसीबीच्या मदतीने खडी हटवण्याचं काम सुरू केले होते. मात्र तोपर्यंत खडीच्या ढिगाखाली दबलेल्या सहा जणांचा मृत्यू झाला होता. तर तीन जण गंभीर जखमी झाले. जखमी व्यक्तींना पोलिसांनी तातडीने स्थानिकांच्या मदतीनं रुग्णालयात दाखल केले आहे.

तीन स्कॉर्पिओ वऱ्हाडाला घेऊन कहलगावला निघाल्या होत्या, मात्र वाटेतच काळाने घाला घातला. दोन स्कॉर्पिओच्या मध्ये असलेल्या स्कॉर्पिओवर खडी वाहतूक करणारा हायवा उलटला, या भीषण अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

ट्रक आणि बसमध्ये झालेल्या अपघातात २१ पोलिस जखमी…

भीषण अपघाताचा लक्ष विचलीत करणारा Video; पाच जागीच ठार…

पुणे शहरात भीषण अपघातात युवकाचा मृत्यू; धक्कादायक Video…

हृदयद्रावक! नवरदेवासह बहीण अन् भाचीचा अपघातात जागीच मृत्यू…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!