
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे शहरात; पाहा वाहतुकीतील बदल…
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर असून, ते पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचार्थ सभा घेणार आहेत. या सभेच्या पार्श्वभीवर पुण्यातील वाहतुकीमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. आज (सोमवार) दुपारी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत शहरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली आहे.
पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!
वाहतूक शाखेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आज दुपारी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत शहरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. रेसकोर्स परिसरातील पाण्याची टाकी ते टर्फ क्लब चौक रस्त्यावर दुहेरी वाहतूक करण्यात येणार आहे. या कालावधित टर्फ क्लब मुख्य प्रवेशद्वार ते टर्फ क्लब चौक रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. सोलापूर रस्त्यावरील अर्जुन रस्ता जंक्शन ते टर्फ क्लब मुख्य प्रवेशद्वार हा रस्ता देखील बंद राहील. बिशप स्कूल सर्कल ते टर्फ क्लब चौक रस्ता बंद राहणार आहे.
पुण्यातील खालील रस्ते वाहतुकीसाठी राहणार बंद
* टर्फ क्लब मुख्य प्रवेशद्वार ते टर्फ क्लब चौक, रस्ता बंद
* सोलापुर रोडवरील अर्जुन रोड जं. ते टर्फ क्लब मुख्य प्रवेशद्वार रस्ता बंद
* बिशप स्कूल सर्कल ते टर्फ क्लब चौक रस्ता बंद
पर्यायी मार्ग उपलब्ध
* गोळीबार मैदान चौक लुल्लानगर ते इच्छित स्थळी
* भैरोबानाला ते लुल्लानगर ते इछित स्थळी
* वॉर मेमोरीयल ते घोरपडी ते डोबारवाडी मार्गे बी.टी. कवडे रोडने इच्छित स्थळी
* मोरओढा सदन कमांड कौन्सिल हॉल ब्लू नाईल मार्गे इच्छित स्थळी
दरम्यान, पुणे शहरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले असून, पुणेकरांना पर्यायी मार्ग दिले आहेत, त्याच रस्त्यानं वाहतूक करावी, असे आवाहन वाहातूक पोलिसांनी केले आहे.
प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
पुणे शहरात वाहनचालकाला फिट आल्याने आठ वाहनांना धडक…
रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
पुणे पोलिस आयुक्तांनी एक लाख रुपयांच्या बक्षिसाची रक्कम दिली विभागून…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

