अभिनेता साहिल खान याला मुंबई पोलिसांनी छत्तीसगडमधून घेतले ताब्यात…

मुंबई: बहुचर्चित महादेव बेटिंग ॲपचा प्रचार आणि प्रसार केल्याच्या आरोप प्रकरणी अभिनेता साहिल खान याला मुंबई पोलिसांनी छत्तीसगढमध्ये जाऊन ताब्यात घेतले आहे. साहिल खानच्या चौकशीवेळी महादेव बेटिंग ॲप प्रकरणात आणखी काही नवीन माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

साहिल खान याने अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायालयाने त्यास नकार देत त्याची याचिका फेटाळून लावली होती. माटुंग्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनकर यांच्या तक्रारीवरून महादेव ऑनलाईन गेमिंग-बेटिंग अ‍ॅप प्रकरणात ३१ हून अधिक जणांविरोधात माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “द लायन बुक ॲप” नावाच्या एका ॲपमध्ये साहिल खान हादेखील भागीदारीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या चौकशीत समोर आली होती.

पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!

साहिल खान यांची मुंबई पोलिस आयुक्तालयात चौकशी करण्यात आली होती. या गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेऊनच मुंबई पोलिसांच्या गुन्ह्यांच्या आधारावर सक्तवसुली संचलनालयाने अर्थात ईडीने गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता. चौकशीअंती हा एकूण 15 हजार कोटींचा हा गैरव्यवहार असल्याची माहिती तपास यंत्रणांकडून देण्यात आली आहे. याच गुन्ह्यांत ईडीने काही दिवसांपूर्वी मालमत्तांवर जप्तीची कारवाई देखील केली होती.

साहिल खान याची अटकपूर्व जामिनची याचिका फेटाळल्यानंतर तो मुंबईतून फरार झाला होता. मुंबईतून गोवा, गोव्यातून कर्नाटक, मग हैद्राबाद असा प्रवास करत तो छत्तीसगढमध्ये पोहोचला. मुंबई पोलिसांचे पथकही त्याच्या मागावर होते. हैद्राबादहून साहिल खान हा छत्तीसगड येथील जगदलबपूर येथे आला असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, महादेव बेटिंग या ॲपशी संबंधित 67 बेटिंग संकेतस्थळे असून ती सर्व परदेशातून नियंत्रित केली जात असल्याची माहिती तपासावेळी समोर आली होती. या ॲप्सची सूत्रे हलवण्यासाठी दोन हजारहून अधिक बनावट सिमकार्ड वापरली गेली. सर्वसामान्यांना विविध खेळांवर सट्टा लावून पैसे जिंकण्याचे आमिष दाखवले गेले. त्याचप्रमाणे, बनावट कागदपत्रांच्या आधारावर उघडलेली 1700 हून अधिक बँक खाती पैसे गोळा करण्यासाठी वापरली गेली. त्यानंतर, पैसे हवाला आणि कूटचलनाद्वारे (क्रिप्टोकरन्सी) वळविण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.

राज कुंद्रा आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीला ईडीचा दणका; कोट्यावधींची संपत्ती जप्त…

‘कुमकुम भाग्य’फेम अभिनेत्रीनेही घेतला जगाचा निरोप…

अभिनेत्रीने केली मैत्रिणीच्या घरी मोठी चोरी अन् गेली गोव्याला…

प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन हिने घेतली पोलिसांत धाव; कारण…

प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!