
आत्याने भाच्यासोबत ठेवले अनैतिक संबंध अन् गरोदरानंतर मिळाली मोठी शिक्षा…
नवी दिल्ली : देहराडूनमधील एका आत्याने (वय २०) आपल्या अल्पवयीन भाच्यासोबत (वय १६) अनैतिक संबंध ठेवल्याची घटना घडली होती. संबंधित घटना उघड झाल्यानंतर पोक्सो कोर्टाने आत्याला दोषी ठरवत वीस वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. पॉक्सो न्यायालयाच्या न्यायाधीश अर्चना सागर यांनी दोषी महिलेला दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
सहाय्यक जिल्हा सरकारी अधिवक्ता अल्पना थापा यांनी सांगितले की, पीडित मुलाच्या आईने या घटनेबाबत बसंत विहार पोलिस ठाण्यात 5 जुलै 2022 रोजी गुन्हा दाखल केला. पतीसोबत मतभेद झाल्याने आरोपी महिला सहा महिन्यांपासून तिच्या माहेरच्या घरी राहत होती. यानंतर तिने 16 वर्षांच्या सावत्र भाच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. काही दिवसांपूर्वी ती भाच्यासह बेपत्ता झाली होती. ती परत आली तेव्हा गरोदर होती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी आत्याला 9 जुलै 2022 रोजी अटक करून तिची तुरुंगात रवानगी केली.
गरोदर असल्यामुळे तिला 2 जानेवारी 2023 रोजी न्यायालयातून जामीन मिळाला. यानंतर तिने एका मुलीला जन्म दिला. मुलीची डीएनए चाचणी झाल्यावर ती पीडित मुलाशी जुळली. मात्र, न्यायालयात ट्रायलसाठी आलेल्या मुलाने लैंगिक अत्याचाराचे आरोप फेटाळून लावले. आत्यासोबत संमतीने संबंध ठेवल्याचे त्याने सांगितले. मात्र तरीही दोषी ठरवत महिलेला वीस वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयाने वॉरंट जारी करून महिलेला शिक्षा भोगण्यासाठी तुरुंगात पाठवले आहे.
दरम्यान, न्यायालयात खटला सुरू असताना पीडित मुलगा आत्याच्या बाजूने बोलला होता. घटनेच्या वेळी तो 18 वर्षांचा होता, असे त्याने सांगितले. शाळेत प्रवेश घेताना कुटुंबीयांनी त्याचे वय दोन वर्षे कमी लावले असल्याचेही त्याने सांगितले. महिलेला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केली नसल्याचेही त्याने सांगितले. घरच्यांना आत्याला घरात ठेवायचे नाही, असा आरोपही त्याने केला. त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे त्याने न्यायालयात सांगितले. मुख्य पीडिताने आरोप फेटाळले असतानाही न्यायालयाने तांत्रिक पुराव्याच्या आधारे निकाल दिला. न्यायालयात मुलाच्या शैक्षणिक कागदपत्रांवरून घटनेच्या वेळी त्याचे वय 16 वर्षे असल्याचे सिद्ध झाले.
पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशय अन् एक दिवस…
वहिनीसोबत प्रेमसंबंध आणि अनैतिक संबंध अन् एकदा…
दिर आणि वहिणीचे अनैतिक संबंध अन् जीव गेला चिमुकल्याचा…
भावकीमध्ये असलेल्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीने घेतला मोठा निर्णय…
अनैतिक संबंध! पोलिसकाकाचे पीएसआय व्हायचे स्वप्न राहिले स्वप्नच…

