
पहिल्या पत्नीच्या तिन चिमुकल्यांना बापाने टाकले विहिरीत अन्…
जालना : अंबड तालुक्यातील डोमेगाव येथे बापानेच एक मुलगा आणि दोन मुलींचा खून करून मृतदेह विहिरीत टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलांची हत्या केल्यानंतर पोलिसांना फोन करून मामा-मामीने माझा मुलगा आणि दोन मुलींना विहिरीत टाकून मारल्याचे सांगितले होते. या प्रकरणी पोलिसांनी मुलांचा बाप संतोष धोंडिराम ताकवाले याला ताब्यात घेतले आहे.
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
संतोष ताकवाले याने रविवारी दुपारी अंबड पोलिसांना फोन करून सांगितलं की, माझा मुलगा आणि दोन मुलींचा मामा-मामीने खून केला. त्यांचे मृतदेह विहिरीत टाकले आहेत. पोलिसांनी डोमेगावच्या पोलिस पाटलांना फोन करून या घटनेची शहानिशा करण्यास सांगितले. पोलीस पाटील विहिरीवर गेले असता तिथे तीन मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे आढळले.
विहिरीत सोहम संतोष ताकवाले (वय ११), मुलगी शिवानी ताकवाले (वय ८), मुलगी दीपाली ताकवाले (वय ७) यांचे मृतदेह होते. हे मृतदेह विहिरीबाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. पत्नीसोबत झालेल्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती पुढे आली आहे. आरोपी संतोष ताकवाले याची दोन लग्नं झाली आहेत. त्याने ज्या तीन मुलांचा खून केल्याचा आरोप आहे ती तिन्ही मुलं त्याच्या पहिल्या पत्नीची होती. पोलिस पुढील तपास करत आहेत.
हृदयद्रावक! एक चिमुकली पाण्यात पडली अन् पुढे तिघींचा मृत्यू…
महाराष्ट्रात आईच्या नात्यालाच काळिमा! प्रियकरासाठी दोन मुलांची हत्या…
हृदयद्रावक! पती-पत्नीमध्ये मध्यरात्री वाद झाला अन् घेतला नको तो निर्णय…
पुणे जिल्ह्यात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

