महिला ips अधिकाऱ्याचा पाठलाग करत राहिला अन् जाळ्यात सापडला…

भोपाळ (मध्य प्रदेश): एक व्यक्ती महिन्यापासून कारने महिला आयपीएस अधिकाऱ्याचा पाठलाग करत होता. एक कार आपल्या पाठिमागे असते, हा संशय आल्यानंतर महिला अधिकाऱ्याने आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

खाण माफियाशी संबंधित हे प्रकरण आहे. आरोपी एका महिन्यापासून ट्रेनी लेडी IPS अधिकारी अनु बेनीवाल यांचे मोबाइल लोकेशन ट्रेस करत होता. आरोपी महिला अधिकाऱ्याचे लोकेशन खाण माफियापर्यंत पोहोचवायचा. मध्य प्रदेशच्या ग्वालियर जिल्ह्यातील हे प्रकरण आहे.

भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी अनु बेनीवाल यांची बिजौली पोलिस ठाणे प्रभारी म्हणून ट्रेनिंग सुरु आहे. या भागात बेकायद रेती उपशाचे काम सुरु होते. अनु बेनीवाल मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे रुटीन चेकिंगवर निघाल्या होत्या. बाहेर निघाल्यानंतर त्यांना एक कार दिसली. संबंधित कार अनेक दिवसांपासून त्यांना आस-पास दिसत होती. त्यांनी ड्युटीवर असलेल्या व्यक्तीला कार चालकाला बोलवण्यासाठी पाठवले. त्या कार चालकाने पोलिसाशीच हुज्जत घालण्यास सुरवात केली. पोलिसांनी त्या संशयित कार चालकाला पकडले व पोलिस ठाण्यात घेऊन आले.

पकडलेल्या संशयिताने चौकशीदरम्यान सांगितले की, ‘आमिर खान नाव असून, खाण माफियाने त्याच्या बेकायदा कामात अडथळा ठरणाऱ्या IPS अधिकारी अनु बेनीवाल यांचे लोकेशन ट्रेस करुन ग्रुपमध्ये शेअर करण्याच काम त्याच्यावर सोपवले होते. या कामाचे त्याला पैसे मिळत होते. आरोपी ज्या कारने पाठलाग करायचा, ती कार जप्त करण्यात आली आहे. आरोपीची चौकशी सुरु आहे.’

ट्रेनी आयपीएस अधिकारी अनु बेनीवाल यांची पोस्टिंग बिजौली भागात झाल्यानंतर त्यांनी खाण माफिया विरोधात कारवाईची मोहिम उघडली होती. त्यामुळेच जिल्ह्यातील खाण माफियांमध्ये भीतीच वातावरण आहे. ते IPS अधिकाऱ्याच लोकेशन जाणून घेण्याच्या मागे लागले होते. कारण बेकायद खाण कामावर छापा मारण्याआधी अधिकाऱ्याच लोकेशन समजले तर ते कारवाईपासून स्वत:ला वाचवू शकतात. त्यामुळे तो पाठलाग करत असल्याचे समोर आले आहे.

IPS महिला अधिकाऱ्याची फसवणूक; लग्नानंतर खरी माहिती उघड…

सुंदरतेसोबत हुशारी! कोणत्याही क्लासेस शिवाय बनली IPS अधिकारी…

IPS अधिकाऱ्याचे कौतुक! पहिल्या पगाराचे काय केले पाहा….

आयपीएस सत्यसाई कार्तिक यांची ऑर्केस्ट्रा बारवर धडक कारवाई…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!