
फेसबुकवरील मित्राने घेतला मैत्रीचा फायदा अन् महिलेला…
बीड : फेसबुकवरील मित्राने मैत्रीचा फायदा घेऊन महिलेवर अत्याचार केल्यानंतर तिला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना परळीमध्ये घडली आहे. अकबर बबन शेख याच्या विरोधात संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिस दल, स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचय?
फेसबुकवर झालेल्या मैत्रीचा गैरफायदा घेऊन आरोपीने पीडित महिलेवर सहा महिने अत्याचार केला. त्यानंतर तिला अमानुष मारहाण करण्यात आली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून अकबर बबन शेख याच्याविरोधात संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
आरोपीने परळीमधील 32 वर्षीय महिलेशी फेसबुक अकाउन्टवर ओळख करुन घेतली. चॅटिंगमुळे मैत्री झाल्यानंतर आरोपीने गैरफायदा घ्यायला सुरुवात केली. आरोपीने पीडित महिलेला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. आरोपीने महिलेच्या राहात्या घरी जाऊन तिच्यावर अत्याचार केला. तसेच तिच्या पतीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सततच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पती, पत्नी और वो! तिघेही हॉटेल रूममध्ये गेले अन् पुढे…
शिक्षिकेला फेसबुकवरील मैत्री पडली महागात…
श्रीलंकेतील महिलेचे फेसबुकवरून जुळले भारतीय युवकासोबत प्रेमसंबंध अन्…
टेलिग्राम आणि व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ग्रुप करायचे अन् लुटायचे…
मुंबई पोलिसांच्या नावे बनावट फेसबुक प्रोफाईल अन् पैसे…

