चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्याची कोठडीत रवानगी…

यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : पार्डी (नस्करी) येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलेल्या आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

घाटंजी तालुक्यातील पार्डी (नस्करी) येथील एका 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी आरोपी गुरुदेव देविदास मडावी (वय 25, रा. पार्डी (नस्करी) ता. घाटंजी) विरुद्ध भादंवि कलम 376, 376 – (A) (B) व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत घाटंजी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी गुरुदेव मडावी यास अगोदर पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तर आज मात्र आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. घाटंजी पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलिस निरीक्षक निलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक राजेश पंडीत पुढील तपास करीत आहे.

पीडित मुलगी (वय 10) ही एकटीच घरी असतांना आरोपी गुरुदेव मडावी (वय 25) याने पीडित मुलीला चाकलेटचे आमिष दाखवून तिचे अज्ञानपणाचा फायदा घेऊन तिला घराचे मागे नेऊन अत्याचार केला. पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरुन घाटंजी पोलिसांनी आरोपी विरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करुन आरोपीला तात्काळ अटक केली आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास घाटंजी पोलिस स्टेशनचे पोलिस उप निरीक्षक राजेश पंडीत हे करत आहे.

अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्यास जन्मठेप आणि फाशीची शिक्षा; पाहा कायदे

संतापजनक! शिक्षक असलेल्या बापानेच चिमुकलीवर केला अत्याचार…

अहमदनगर जिल्ह्यात वस्तीगृहात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार…

अल्पवयीन मुलीवर एकाच दिवसात दोन वेळा अत्याचार…

शासकीय ठेकेदाराचा महिलेवर ऑफिसमध्येच केला बलात्कार; शिवाय…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!