
पिंपरी-चिंचवडमधील ड्रग्स प्रकरणात पोलिस अधिकाऱ्याला बेड्या…
पुणे : ड्रग्स विक्री प्रकरणात चक्क पिंपरी चिंचवडमधील एका फौजदाराला अटक करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. सांगवी पोलिसांनी गस्ती दरम्यान एका व्यक्तीकडून दोन किलो एमडी ड्रग्स जप्त केले होते. या ड्रग्सची किंमत तब्बल दोन कोटी रुपये इतकी आहे. या प्रकरणात नमामी झा नावाच्या हॉटेल चालकाला अटक करण्यात आली होती.
आरोपी नमामी झाकडे जे ड्रग्स आढळून आले त्यामध्ये पिंपरी चिंचवड पोलीस दलातील निगडी पोलिस स्टेशनचा पोलिस उपनिरीक्षक विकास शेळके याचाही सहभाग असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई करत विकास शेळके याला अटक केली आहे. झडतीमध्ये त्याच्याकडून तब्बल 45 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहे.
अटक करण्यात आलेल्या विकास शेळके याच्या मालकीच्या पिंपरी चिंचवड शहरात दोन ते तीन हॉटेल्स असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास आमली पदार्थ विरोधी पथकाकडून सुरू आहे. शेळके याने यापूर्वी ड्रग्स तस्करी केली आहे का? या प्रकरणात आणखी कोणते अधिकारी सहभागी आहेत का याचा शोध सुरू आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड पोलीस दलाची मान खाली गेली आहे. कारण 15 दिवसांपूर्वीच पिंपरी चिंचवड पोलीस दलातील दोन कर्मचारी खंडणी उकळल्या प्रकरणी निलंबित करण्यात आले होते. तर दोन अधिकाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याची लाच प्रकणात बदली करण्यात आली आहे.
दरम्यान, पुणे पोलिस आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ड्रग्स तस्करांवर करडी नजर ठेवली आहे. मागील काही दिवसांत पुणे पोलिसांनी मोठे ड्रग्स रॅकेट उघडकीस आणले आहे. साधारण 4000 कोंटी रुपयांचे ड्रग्स पुणे पोलिसांनी पुणे, सांगली आणि दिल्लीतून जप्त केले आहे. त्यानंतर पुणे पोलिसांनी विविध भागात पेट्रोलिंग सुरु केले आहे. पुण्यात मोठं ड्रग्स रॅकेट पकडल्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्येही ड्रग्स पकडण्यात आले होते. त्यानंतर दोन्ही शहरातील पोलिसांनी ड्रग्स तस्करीवर आळा घालण्यासाठी कंबर कसली आहे.
पुणे पोलिसांची ड्रग्जनंतर दारूवर मोठी कारवाई…
पुणे पोलिसांची ड्रग्जविरोधात मोठी कारवाई, कोट्यावधींचे ड्रग्ज जप्त…
Video: पुणे शहरात एम.डी. ड्रग्ज रॅकेटच्या आंतरराष्ट्रीय टोळीस अटक…
ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी पुणे पोलिसांची कारवाई; दोन पोलिस बडतर्फ…
पुणे जिल्ह्यात फिनेलच्या नावाखाली ड्रग्जची निर्मिती; कंपनी सील; ड्रग्ज जप्त…

