नाशिक शहरात युनिट १ची मोठी कामगिरी; अपहरणकर्त्यांची २४ तासांत सुटका…

नाशिक: नाशिकमधून अपहरण करुन ०४ कोटी १० लाख रुपये खंडणी मागणा-या आरोपीस गुन्हेशाखा युनिट क्र. १ जेरबंद केले आहे. शिवाय, ०२ अपहृत व्यक्तींची २४ तासांत सुटका केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

२८/०२/२०२४ रोजी रात्री ०८:३० वा. सुमारास सिबीएस येथून विष्णु भागवत व त्याचा भाऊ रुपचंद भागवत यांचे अपहरण केले बाबत सरकारवाडा पोलिस ठाणे कडील गुरनं ६९/२०२४ भादवि कलम ३६४ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयातील अपहृत व्यक्तींचा व आरोपींचा शोध घेणेबाबत पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलिस उपआयुक्त, गुन्हेशाखा प्रशांत बच्छाव, सहा. पोलिस आयुक्त, गुन्हेशाखा डॉ. सिताराम कोल्हे यांनी गुन्हेशाखा युनिट १ यांना मार्गदर्शन केले होते.

सदर गुन्हयाचा गुन्हेशाखा युनिट क्र. १ कडील अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ गुन्हयाचे घटनास्थळावर भेट देवुन गुन्हयाचा समांतर तपास सुरु केला. सदर तपासा दरम्यान करीत असतांना घटनास्थळाचे आजुबाजुचे सीसीटीव्ही फुटेज वरुन व तांत्रिक माहितीच्या आधारे श्रेणी पोउनि / रविंद्र बागुल, पोहवा / विशाल काठे, पोना/ मिलींदसिंग परदेशी यांनी आरोपींची नावे १) राकेश सोनार, २) सुनिल चव्हाण, ३) संभाजी कवळे, ४) वेदांत येवला, ५) प्रशांत सुर्यवंशी अशी नावे निष्पन्न केले. आरोपी यांनी खंडणीच्या पैशांची व्यवस्था करण्यासाठी अपहृत व्यक्ती रुपचंद भागवत यास गरवारे पॉइंट येथे सोडुन दिले असल्याने त्याचेकडे तात्काळ गुन्हेशाखा युनिट क्र. ०१ यांनी विचारपुस करुन घटनेची माहिती समजावून घेवून आरोपींनी खंडणीची मागणी करत असल्याचे दिसून आले. आरोपी यांनी दुसरा अपहृत व्यक्ती विष्णु भागवत यास घेवुन फिरत होते. तांत्रिक माहिती वरुन आरोपी हे नगर जिल्हयात असल्याचे समजल्यावरून गुन्हेशाखा युनिट १ चे पथक त्यांच्या मागावर असतांना आरोपी यांनी अपहृत विष्णु भागवत यास लोणी येथे सोडल्याने त्यांची लोणी येथुन सुटका करण्यात आली आहे.

सदर गुन्हयातील आरोपींचा शोध घेत असतांना श्रेपोउनि / रविंद्र बागुल, पोहवा / विशाल काठे, पोना/ मिलींदसिंग परदेशी यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील एक आरोपी हा त्याचे ताब्यातील काळया रंगाची स्कोडा कार क्र. MH 04 DN 9677 हिचेसह सातपुर परिसरात येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यावरुन वरीष्ठ पोलिस निरीक्षक विदयासागर श्रीमनवार यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि हेमंत तोडकर, श्रेपोउनि / रविंद्र बागुल, पोहवा / महेश साळुंके, योगीराज गायकवाड, प्रदिप म्हसदे, प्रविण वाघमारे, विशाल काठे, नाझीम पठाण, पोना / विशाल देवरे, मिलींदसिंग परदेशी, पोअंम/ अप्पा पानवळ, राजेश राठोड, अमोल कोष्टी, अशांनी अशोक नगर येथे सापळा लावून आरोपी वेदांत दत्तात्रय येवला (वय – २१वर्षे, रा- नागरे चौक, अशोकनगर, सातपुर, नाशिक) यास ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या कबुलीवरुन त्याचे कडुन ३,००,०००/- रु. किंमतीची स्कोडा कार क्र. MH 04 DN 9677 कार जप्त करण्यात आली. तसेच ३०,००० /- रुपये किंमतीचा देशी बनावटीचा कट्टा व ५००/- रुपये किंमतीचा एक जिवंत राउंड असा एकुण ३,३०,५००/- रु.चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपीतास पुढील कारवाई कामी सरकारवाडा पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. उर्वरीत पाहिजे आरोपीतांचा शोध घेवुन अटक करत आहोत.

सदर गुन्हयाची उकल गुन्हेशाखा युनिट क्र. ०१ यांनी उवघ्या २४ तासात केल्याने पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी नमुद पथकाला बक्षीस व प्रमाणपत्र देवुन सन्मानीत केले आहे. सदरची कामगीरी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, प्रशांत बच्छाव, पोलिस उप आयुक्त, गुन्हेशाखा, डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलिस आयुक्त, गुन्हेशाखा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क्र. १ नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. विदयासागर श्रीमनवार, सपोनि / हेमंत तोडकर, पोउपनि / चेतन श्रीवंत, पोउपनि/ विष्णु उगले, श्रेपोउनि / रविंद्र बागुल, सपोउनि / सुरेश माळोदे, सुगन साबरे, पोहवा / योगीराज गायकवाड, प्रदिप म्हसदे, प्रविण वाघमारे, विशाल काठे, धनंजय शिंदे, संदिप भांड, देविदास ठाकरे, महेश साळुंके, नाझीम पठाण, पोना/ विशाल देवरे, मिलींदसिंग परदेशी, पोअंम/अप्पा पानवळ, राजेश राठोड, अमोल कोष्टी, समाधान पवार, मपोअं / अनुजा येलवे यांनी केली आहे.

नाशिकमध्ये पानटपरी चालकांवर विशेष मोहिम राबवून कारवाई…

नाशिकचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या संकल्पनेमधून नागरीकांशी सुसंवाद!

नाशिक पोलिसांनी बहेनवाल गँगच्या म्होरक्यासह तीन आरोपींना दिल्लीमधून केली अटक…

नाशिकमध्ये खून करून फरार झालेल्या दोघांना युनिट १ने ठोकल्या बेड्या…

नाशिक शहरात घरफोड्या करणाऱ्याला भद्रकाली पोलिसांनी घेतले ताब्यात…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!