
जवानाने ‘माणूस मरतो पण आत्मा अमर आहे’ असा स्टेटस ठेवला अन्…
गडचिरोली : गडचिरोली येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या राज्य राखीव दलाच्या जवानाने सोमवारी (ता. १२) सकाळी साडेअकराच्या सुमारास स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. उत्तम किसनराव श्रीरामे (वय 32, रा. देगलूर, नांदेड) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी ‘माणूस मरतो पण आत्मा अमर आहे’ असा स्टेटस व्हॉटस्अपला ठेवले होता.
गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असलेल्या उत्तम यांचे तीन वर्षांपूर्वीच विवाह झाला होता. त्यांनी यापूर्वी पुणे येथील राज्य राखीव दलाच्या गट क्र.1 मध्ये सेवा बजावली होती. सध्या ते गडचिरोली जिल्ह्यातील शिखरदीप या जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय बंगल्यात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते तणावात असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ड्युटी संपल्यावर बंगल्यातीलच विश्रामगृहात खाटेवर झोपून स्वतःच्या डोक्यात बंदुकीतून गोळी झाडून घेतली आहे. जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या शासकीय निवासस्थानी ही आत्महत्येची थरारक घटना घडली आहे.
शिखरदीप बंगल्यातून अचानक जोरदार गोळीबार झाल्याचा आवाज आला. त्यानंतर इतर सुरक्षा रक्षक आणि इतरांनी हा आवाज कोठून आला हे बघण्यासाठी धाव घेतली. त्यावेळी उत्तम रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. या घटनेआधी काही वेळापूर्वीच जिल्हाधिकारी संजय मीणा हे सुटीवरून बाहेर गावाहून गडचिरोली येथे आपल्या शासकीय बंगल्यात पोहोचले होते.
या घटनेनंतर जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी गडचिरोली पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांसह राज्य राखीव दलाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यावर धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा सुरू करत उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. सध्या या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.
जवान संदीप मोहिते अनंतात विलीन; काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश…
पाकिस्तानमधून परतलेले जवान चंदू चव्हाण यांची आर्थिक फसवणूक…
काश्मीरमध्ये हुतात्मा झालेल्या जवानांची हृदयद्रावक कहानी…
सुट्टीवर आलेल्या जवानाचा सख्ख्या भावानेच घेतला बळी…
जबलपूरमध्ये लष्कराच्या वाहनाला अपघात; महाराष्ट्राच्या जवानाचा मृत्यू…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

