
पुणे शहरात सलग तिसऱ्या दिवशी खून; आईच्या हत्येनंतर मुलगा…
पुणे : पुणे शहरात सलग तिसऱ्या दिवशी खुनाची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. औंधमध्ये शनिवारी (ता. १०) एकाने सहकाऱ्यावर गोळीबार करत आत्महत्या केली. बुधवार पेठेत शुक्रवारी (ता. ९) एकाने वस्ताऱ्याने व्यक्तीचा गळा चिरून खून केला. त्यानंतर आज (रविवार) सकाळी मुलाने आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना खडकी भागात असलेल्या रेंज हिल परिसरात घडली आहे.
गुंभाबाई शंकर पवार (वय ५५) असे हत्या महिलेचे नाव आहे. त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर याने ही हत्या केली असून ज्ञानेश्वरच्या मित्राने या प्रकरणी पोलिसात फिर्याद दिली आहे. ज्ञानेश्वर एका फॅक्टरीमध्ये काम करतो. तो त्याच्या आईसोबत खडकी परिसरात राहत होता.
ज्ञानेश्वरने आईच्या मानेवर तीक्ष्ण हत्याराने वार केल्यानंतर खोलीला बाहेरून कुलुप लावून तो पळून गेला. आई रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे ज्ञानेश्वरचा मित्र मेहर सुहास यांना दिसले. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, पुणे शहरात शनिवारी अनिल ढमाले नावाच्या सराफा व्यापाऱ्याने आकाश जाधव नावाच्या व्यक्तीवर गोळीबार केला आणि मग स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. या हल्ल्यात आकाश जाधव गंभीर जखमी आहे. आर्थिक वादातून हा प्रकार घडला आहे. पुण्याच्या औंध भागात भाले चौकात हा प्रकार घडला आहे. अनिल ढमाले यांचं अनिल ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. चौदा वर्षांपासून अनिल ढमालेने दुकान भाड्याने घेतले होते. दुसऱ्या घटनेत पत्नीने दुसरा विवाह केल्यामुळे चिडलेल्या पहिल्या नवऱ्याने वस्ताऱ्याने दुसऱ्या नवऱ्याची हत्या केली. याबाबतचा पुढील तपास फरासखाना पोलिस करत आहेत.
शरद मोहोळ प्रकरणाशी संबंधित आरोपी ससून रुग्णालयातून पळाला…
पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्लाप्रकरणी गुन्हा दाखल…
पुणे शहरात बाप-लेकाचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह…
पुणे पोलिस आयुक्तपदाचा अमितेश कुमार यांनी स्विकारला पदभार…
धक्कादायक! पुणे शहरात प्रियकराने घरात घुसून प्रेयसीच्या आईचा केला खून…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

