थरार! शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले…

पुणे: गँगस्टर शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणे याच्यासह तिघांना पुणे पोलिसांनी थरारक पाठलाग करून पकडले. गणेश मारणे हा शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असून तो गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. पुणे पोलीस गुन्हे शाखेने नाशिक रोड येथून अटक केली. शरद मोहेळ हत्याप्रकरणातील मुख्य सुत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्यासह 16 जणांवर मोक्का लावण्यात आला आहे.

पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची त्याच्या लग्नाचा वाढदिवशीच म्हणजे 5 जानेवारी रोजी दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने पुण्यासह राज्यात एकच खळबळ उडाली होती. शरद मोहोळ हत्या प्रकरणात 20 हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. शरद मोहोळ याची हत्या झाल्यानंतर काही तासांमध्ये सात जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर 15 जानेवारी रोजी पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेने शरद मोहोळ हत्या प्रकरणात दहा जणांना पनवेल आणि वाशीमधून अटक केली. विठ्ठल शेलार, रामदास उर्फ वाघ्या मारणे यासह दहा जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून अटक केली होती.

मुन्ना पोळेकर हा मुख्य आरोपी असल्याचे मानले जात होते. पोळेकर याने इतर साथीदारांसोबत या हत्तेचा कट रचल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले होते. मात्र, पोलीस तपासात अनेक गोष्टी समोर आल्यानंतर अनेकजण पोलिसांच्या रडारवर आले आहेत. पुणे पोलिसांनी नाशिकमधून या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला गणेश मारणे याला अटक केली आहे.

गणेश मारणे गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. गणेश मारणे तुळजापूर येथे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पुणे पोलिस तुळजापुरात दाखल झाले. परंतु तो पुढे कर्नाटक गेला. यामुळे गुन्हे शाखेचे दुसरे पथक कर्नाटकमध्ये पोहचले. परंतु पुन्हा एकदा गणेश मारणे याने पोलिसांना चकवा दिला. तो कर्नाटकमधून केरळमध्ये पसार झाला. त्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ओडिशा राज्यात गेला. तेथून पुन्हा नाशिकमध्ये आला. पुणे पोलिसांना गणेश मारणे नाशिकमध्ये असल्याची टीप मिळाली. त्यानंतर पुणे पोलिसांनी सापळा रचला.

पुणे पोलीस गणेश मारणे याच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेऊन होते. तंत्रज्ञानाची मदत घेऊन त्याचा ठावठिकाणा शोधत होते. मग त्याचे लोकेशन ट्रेस झाले. त्यानंतर पोलिसांनी नाशिक येथून त्याचा पाठलाग सुरू केला. रस्त्यात तीन ट्रॅव्हल्स बसची तपासणी केली. अखेर मारणेसह त्याच्या साथीदारांना मोटारीतून जात असताना पकडले. पाठलाग करत त्यांना मोशी टोलनाक्याजवळ ताब्यात घेतले. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली. गणेश मारणे हा शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असून तो गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. पुणे पोलिसांनी शरद मोहोळ हत्याप्रकरणी आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. त्यात गणेश मारणे याचाही समावेश आहे.

पुणे पोलिसांकडून आधीच 24 जणांना अटक
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शरद मोहोळ हत्येप्रकरणी जवळपास 24 जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर, नामदेव महिपती कानगुडे, अमित ऊर्फ अमर मारुती कानगुडे, चंद्रकांत शाहू शेळके, विनायक संतोष गव्हाणकर, विठ्ठल किसन गांदले, ॲड. रवींद्र पवार, ॲड. संजय उडान, विठ्ठल शेलार, रामदास ऊर्फ वाघ्या मारणे, धनंजय मारुती वटकर, सतीश संजय शेडगे, नितीन अनंता खैरे, आदित्य विजय गोळे, संतोष दामोदर कुरपे यांना बेड्या ठोकल्या आहेत.

Video: शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मास्टरमाइंडची पोलिसांनी काढली धिंड…

शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी ‘वाघ्या’ला अटक…

शरद मोहोळ हत्या प्रकरणात आणखी नवी माहिती समोर…

गँगस्टर शरद मोहोळ याचा CCTVसमोरच का केला खून…

मुळशी पॅटर्न! गँगस्टर शरद मोहोळ याच्या हत्येमागची INSIDE STORY…

शरद मोहोळची पत्नी कडाडली; नवरा वाघ होता तर मी वाघीण आहे…

कुख्यात गुंड शरद मोहोळ प्रकरण! पोलिसांनी आवळल्या आठही जणांच्या मुसक्या…

पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा लग्नाच्या वाढदिवशी हल्ल्यात मृत्यू…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!