मुंढवा पोलिसांनी वाईन शॉप फोडणाऱ्या सराईतांना ठोकल्या बेडया…

पुणे (संदिप कद्रे): वाईन शॉप फोडून घरफोडी करणारे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना मुंढवा पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

मुंढवा पोलिस ठाणे हददीत केशवनगर भागात विरांश वाईन्स हे दुकान २७/१२/२०२३ रोजी रात्री चार अज्ञात आरोपीने फोडुन दुकानातील रोकड व विदेशी दारुच्या बाटल्याचे बॉक्स असा एकुण ४,६०, ५७० /- रु चा मुददेमाल चोरुन नेला होता. त्याबाबत मुंढवा पोलिस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर ४०१/२०२३ भा.द.वि कलम ४५४,४५७,३८०,३४ प्रमाणे दाखल झाला होता. दाखल गुन्हयाचा तपास वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली मुंढवा तपास पथक अधिकारी व अंमलदार करीत होते. तपासात दोन पथक नेमण्यात आले होते. दोन्ही पथकामार्फत सीसीटीव्ही च्या माध्यमातून आरोपींचा शोध घेण्याचे काम चालू होते. सदर तपासात सलग १५ दिवस एकूण २५० च्या वर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तपास चालु असतानाच तपास पथकातील अंमलदार पोशि सचिन पाटील व पोशि स्वप्नील रासकर यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत गोपनीय माहीती मिळाली की, सदर गुन्हयातील संशयित आरोपी खडकी परीसरात येणार असल्याची माहिती मिळाली.

सदरची माहीती ही तात्काळ त्यांनी तपास पथकातील प्रभारी सपोनी संदीप जोरे यांना कळविली. त्यांनी सदरबाबतची गोपनीय बातमी वपोनी महेश बोळकोटगी यांना कळवुन त्यांनी लागलीच कारवाईचे आदेश दिल्यानंतर तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी योग्य तो सापळा रचून संशयित दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना मुंढवा पोलिस स्टेशन येथे आणुन त्यांना विश्वासात घेवुन चौकशी केली असता त्यांनी व त्यांच्या दोन साथिदारांनी मिळुन सदरचे वाईन शॉप हे दारुची विक्री करण्याचे उददेशाने फोडुन घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढील प्रमाणे आहेत.
१) ओंकार ऊर्फ पल्या सुधाकर परमवार वय २४ वर्षे रा ९२ जुनाबाजार, नवी तालीम समोर खडकी पुणे
२) अरबाज मुनीर शेख वय १९ वर्षे रा घर नं ७७/२१ खडकी बाजार गोपी चाळ खडकी पुणे असे असुन दोन्हीही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

आरोपींवर पुणे शहरात विविध पोलिस ठाणेस चोरीचे घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. अटक आरोपीस प्रथमवर्ग न्यायालय लष्कर कोर्ट पुणे यांनी २३/०१/२०२४ रोजी पर्यतची पोलिस कस्टडी दिलेली असुन पोलिस कस्टडीत आरोपीकडुन ३३,६००/-रुकिमतीची विदेशी दारु जप्त करण्यात आली असून, अटक आरोपीकडे गुन्हयातील रोकड बाबत अधिक तपास चालू आहे. आरोपीच्या इतर साथिदार यांचा शोध घेण्याचे काम चालू आहे.

सदरची कामगीरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, रामनाथ पोकळे अति कार्यभार सह पोलिस आयुक्त पुणे शहर, रंजनकुमार शर्मा अपर पोलिस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग पुणे शहर, ए. राजा पोलिस उप- आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर, अश्विनी राख, सहा. पोलिस आयुक्त हडपसर विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली महेश बोळकोटगी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मुंढवा पोलिस ठाणे पुणे, श्रीमती सुनिता रोकडे, पोलिस निरीक्षक (गुन्हे), मुंढवा पोलिस ठाणे पुणे, तपास पथकाचे सहा पोलिस निरीक्षक संदिप जोरे, संतोष काळे, संतोष जगताप, दिनेश भांदुर्गे, दिनेश राणे, महेश पाठक, राहुल मोरे, पोशि स्वप्नील रासकर, हेमंत पेरणे, सचिन पाटील यांनी केली आहे.

मुंढवा पोलिस स्टेशनच्या पोलिसकाकांमुळे युवकाचे वाचले प्राण…

मुंढवा पोलिस स्टेशनच्या वतीने रूट मार्च…

मुंढवा पोलिसांनी फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेडया…

मुंढवा पोलिसांनी अल्पवयीन मुलाकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत…

मुंढवा परिसरात सावकारांच्या धमकीमुळे एकाची आत्महत्या…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!