
नाशिकचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली कोम्बिंग ऑपरेशन…
नाशिकः नाशिक शहरचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांचे मार्गदर्शनाखाली अयोध्या येथील राममंदिर प्राणप्रतिष्ठा व तसेच प्रजासत्ताक दिनाचे पार्श्वभूमीवर परिमंडळ – २ नाशिक शहर कार्यक्षेत्रात कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले.
नाशिक शहरचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांचे मार्गदर्शनाखाली अयोध्या येथील राममंदिर प्राणप्रतिष्ठा व त्याअनुषंगाने विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रम तसेच प्रजासत्ताक दिनाचे पार्श्वभूमीवर रेकॉर्ड वरील शरिरा विरुध्दचे गुन्हेगार, समाजकंटक चेक करणे, गुन्हयात पाहिजे / फरारी आरोपीतांना अटक करणे, टवाळखोरांवर कारवाई, इत्यादी करीता परिमंडळ – २ कार्यक्षेत्रात दि. १९/०१/२०२४ रोजी १९.०० ते २२.०० वा. पावेतो कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यांत आले.
सदरचे कोम्बिंग ऑपरेशन करीता मोनिका नं. राऊत, पोलिस उप आयुक्त, परिमंडळ – २, शेखर देशमुख, सहाय्यक पोलिस आयुक्त, अंबड विभाग व डॉ. सचिन बारी, सहाय्यक पोलिस आयुक्त, नाशिकरोड विभाग यांनी अधिनस्त पोलिस स्टेशन प्रभारी अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करुन परिणामकारक कोम्बिगं ऑपरेशन राबवून खालील प्रमाणे कारवाई करुन घेतलेली आहे.
१. रेकॉर्डवरील शरिरा विरुध्दचे तसेच तडीपार, असे एकुण १२३ गुन्हेगारांना चेक करून,
• गुन्हेगारांचे चौकशीफॉर्म भरुन घेवून आवश्यक ती कारवाई करण्यांत आलेली आहे.
२. १७२ टवाळखोरां विरुध्द ११२/११७ प्रमाणे कारवाई केली आहे.
३. देवळाली कॅम्प पोस्टे हद्दीत सराईत गुन्हेगारांचे घरझडतीत ०३ धारदार शस्त्रे जप्त करून कारवाई करण्यांत आली.
४. समन्स / वॉरंट मधील इसमांना चेक करुन ०४ इसमांना वॉरंटची बजावणी करण्यांत आली आहे.
५. दारूबंदी कायदयान्वये इंदिरानगर व उपनगर या पोस्टे. हद्दीत एकुण ०२ केसेस / गुन्हे करण्यांत आले आहे. त्यात एकुण ८४७० रू. चा देशी विदेशी दारू साठा जप्त केला आहे.
रेकॉर्ड वरील माला विरुध्द, शरिरा विरुध्दचे गुन्हेगार, तडीपार तसेच घातक हत्यारे, अग्निशस्त्र बाळगून गुन्हे करणारे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करुन दहशत निर्माण करणारे गुन्हेगारांना अचानकपणे कोम्बिंग, ऑलआउट, नाकाबंदी, इत्यादी कारवाईत चेक करून, घडझडत्या घेवून तसेच डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून गंभीर गुन्हे उघडकीस आणून अटक करण्याची कारवाई पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांचे मार्गदर्शनाखाली नियमित सुरु राहणार असल्याचे श्रीमती मोनिका नं. राऊतं, पोलिस उप आयुक्त, परिमंडळ – २,नाशिक शहर यांनी सांगितले आहे.
नाशिक पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांची मोक्का अंर्तगत कारवाई; पाहा आरोपींची नावे…
नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी हातात बॅट घेतली अन्…
नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सुरू केलेल्या व्हॉट्सऍप सेवेला मोठा प्रतिसाद…
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचा ‘सुरक्षित नाशिक’ संकल्पनेवर भर…
Video: नाशिकमध्ये मद्यपान करणाऱ्यांना ‘विशेष चेतावणी’…
नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या धडाकेबाज कारवाया सुरू…
संदीप कर्णिक यांनी स्वीकारला नाशिक पोलिस आयुक्तपदाचा पदभार!
पुणेकरांची मनं जिकली! संदीप कर्णिक नाशिकचे नवीन पोलिस आयुक्त!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

