
हृदयद्रावक! वहिनीचे दिरासोबत प्रेमसंबंध; तीन चिमुकले अन् पोलिस…
लखनौ (उत्तर प्रदेश): तीन मुलांची आई असलेली वहिनी आणि दिराचे प्रेमसंबंध होते. घरातून मुलांसह दोघांनी पळ काढला. पुढे त्यांनी लहान चिमुकल्यांना थंडीत जंगलाजवळ सोडले आणि तिथून पळून गेले. पोलिसांना थंडीमध्ये चिमुकले कुडकुडताना दिसल्यावर चौकीत आणले आणि त्यांना उबदार कपडे दिली. पुढे नातेवाईकांच्या ताब्यात दिले. पोलिसांच्या माणुसकीमुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
श्रावस्ती पोलिसांना रात्रीच्या वेळी जंगलाजवळ थंडीत 3 लहान मुलं कुडकुडताना दिसली. पोलिसांनी चौकशी केली असता मुलांनी वडिलांचे नाव आणि घरचा पत्ता सांगितला. पोलिसांनी त्यांना सर्वप्रथम पोलिस ठाण्यात आणले. कुडकुडल्यामुळे उबदार कपडे घालायला दिली आणि खाण्यासाठी काही वस्तू दिल्या. त्यानंतर त्या मुलांना घरी नेण्यात आल्. याच दरम्यान मुलांनी आईबद्दल जे सांगितलं ते ऐकून पोलिसही हैराण झाले.
श्रावस्ती जिल्ह्यातील भिनगा कोतवाली भागातील एका गावातील एक महिला 3 मुलांसह तिच्याच दिरासोबत 6 महिन्यांपूर्वी पळून गेली होती. लखनौमध्ये तिची मुलं आणि प्रियकरासह राहत होती. पण, पुढे एका रात्री ही महिला प्रियकरासह श्रावस्ती येथे पोहोचली. आपल्या तीन मुलांना ऐन थंडीत जंगलाजवळ सोडले आणि प्रियकरासह पळून गेली.
पोलिस गस्त घालत असताना त्यांना थंडीत कुडकुडत असलेली तीन मुलं दिसली. पोलिसांनी गाडी थांबवली आणि त्यांना आपल्यासोबत पोलिस ठाण्यात घेऊन आले. मुलांना उबदार कपडे आणि खाऊ दिला. चिमुकल्यांनी चौकशीत सांगितले की, आई आणि काका लखनौमध्ये राहतात. त्यांनी रात्री बसने आम्हाला आणले आणि जंगलाजवळ सोडले. यासोबतच मुलांनी घराचा पत्ता सांगितला. पोलिसांनी त्यानंतर मुलांना आजी-आजोबांच्या ताब्यात दिले. तसेच संबंधित महिला आणि तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या कौतुकास्पद कामगिरीमुळे पोलिस पथकाला पोलिस अधीक्षकांनी बक्षीस जाहिर केले आहे.
दिर आणि वहिणीचे अनैतिक संबंध अन् जीव गेला चिमुकल्याचा…
वहिनीसोबत प्रेमसंबंध आणि अनैतिक संबंध अन् एकदा…
नात्याचा शेवट! अल्पवयीन दीर आणि वहिनीला रंगेहाथ पडकले…
वहिनी आणि मांत्रिकाचे प्रेमसंबंध; दिर बलात्कार अन् आत्महत्या…
दिराचे वहिनीसोबत अनैतिक संबंध अन् वहिनीचे आणखी…

