शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी ‘वाघ्या’ला अटक…

पुणे : गँगस्टर शरद मोहोळ हत्येप्रकरणी मुख्य आरोपी रामदास मारणे उर्फ वाघ्या आणि गुंड विठ्ठल शेलार याच्यासह इतर आरोपींना पनवेल पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांना पुणे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.  शरद मोहोळ याच्या हत्येचा कट रचण्यात रामदास मारणे उर्फ वाघ्या आणि गुंड विठ्ठल शेलारची मुख्य भूमीका आहे.

शरद मोहोळ हत्येप्रकरणी आतापर्यंत पुणे पोलिसांनी 13 जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. शरद मोहोळ हत्येच्या कटातील मुख्य आरोपी रामदास मारणे याच्यासह 10 आरोपींना अटक करण्यात नवी मुंबई पोलीसांना यश आले. अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींपैकी तीन मुख्य आणि तीन संशयीत आरोपी आहे. पनवेल पोलीसांनी पनवेल येथील एका फार्म हाऊसवर कारवाई करत आरोपींना अटक केली आहे. आरोपींना पुणे पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.

शेलार आणि मारणे यांचा शरद मोहोळच्या हत्येचा कट रचण्यात सहभाग असल्याच तपासात निष्पन्न झाल्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. शरद मोहोळ याच्या हत्येनंतर हे सर्व आरोपी पनवेल आणि वाशी भागात लपून बसले होते. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रात्री लपलेल्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी पनवेल पोलीसांची मदत घेण्यात आली. या सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे..

दरम्यान, आतापर्यंत मुन्ना पोळेकर हा मुख्य आरोपी असल्याचे मानले जात होते. पोळेकरने इतर साथीदारांसोबत या हत्तेचा कट रचल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले होते. परंतु आता शरद मोहोळ प्रकरणात रोज नव्याने नावे समोर येत आहे. रामदास मारणेचे नाव समोर आल्यानंतर वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. जमीनीच्या वादातून हत्या झाली आहे.

पुणे शहरातील कोथरूड येथे ५ जानेवारी रोजी शरद मोहोळवर मुन्ना पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी गोळीबार केला होता. यात गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळचा रुग्णालयात मृत्यू झाला होता. शरद मोहोळ याच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी याआधी १३ जणांना अटक केली होती. शरद मोहोळ याच्या हत्येसाठी मुन्ना पोळेकरने तब्बल दीड वर्षांपासून प्लॅनिंग सुरू होते, अशी माहिती समोर येत आहे. शरद मोहोळला एकटे गाठून मारण्याचा प्रयत्नही याआधी केला गेला असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले आहे.

मुन्ना पोळेकरसह हल्लेखोरांनी गोळीबाराचा सराव कुठे केला, त्यांना आर्थिक रसद कुणी पुरवली, पिस्तुल कुठून आणली याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. हडशी इथं गोळीबाराचा महिनाभर सराव केल्याचं तपासात समोर आलं होतं. याशिवाय त्यांना आर्थिक मदत करणाऱ्या दोघांनाही अटक केली आहे. आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात २३ जणांना अटक केली असून यात २ वकीलसुद्धा आहेत.

शरद मोहोळ हत्या प्रकरणात आणखी नवी माहिती समोर…

गँगस्टर शरद मोहोळ याचा CCTVसमोरच का केला खून…

मुळशी पॅटर्न! गँगस्टर शरद मोहोळ याच्या हत्येमागची INSIDE STORY…

शरद मोहोळची पत्नी कडाडली; नवरा वाघ होता तर मी वाघीण आहे…

कुख्यात गुंड शरद मोहोळ प्रकरण! पोलिसांनी आवळल्या आठही जणांच्या मुसक्या…

पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा लग्नाच्या वाढदिवशी हल्ल्यात मृत्यू…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!