
पुणे शहरात कार्यालयातील लाखो रुपये चोरणाऱ्याला युनिट ४ने ठोकल्या बेड्या…
पुणे (संदीप कद्रे): बालेवाडी परिसरातील एस. के. पी. कॅम्पस येथील ज्ञानसागर इनस्ट्युट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या कार्यालयातून साडे आकरा लाख रुपयांची रोकड चोरून पसार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट चारने बेड्या ठोकल्या आहेत. संगमवाडी येथील ट्रॅव्हल्स पार्किंगमधून त्याला पकडण्यात आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
फिर्यादी यांनी ३०/१२/२०२३ रोजी सायंकाळी ०६/०० वा. ते ३१/१२/२०२३ रोजी ११/३० वा. चे सुमारास एस के पी कॅम्पस बालेवाडी पुणे येथिल ज्ञानगसागर इन्स्टयुट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च या ऑफिसमधील रोख ११,५०,०० रुपये चोरी गेले बाबत चतुःश्रृंगी पोलिस ठाणे येथे गु.र.नं. ९५३/२०२३ भा.द.वि. कलम ३८० प्रमाणे तक्रार दिल्याने गुन्हा दाखल होता. दाखल गुन्हयाचा गुन्हे शाखा युनिट ०४, समांतर तपास करत असताना तांत्रीक विश्लेषणाद्वारे दाखल गुन्हयामध्ये आरोपी निष्पन्न करुन दि. ०५/०१/२०२४ रोजी आरोपीचा शोध घेत असताना पोलिस अंमलदार सारस साळवर व वैभव रणपिसे यांना त्यांचे बातमीदारामार्फत सदर गुन्हयातील आरोपी वाल्मिक पाटील हा संगमवाडी पार्किंग क्र. ३ येथे आला असून तो गावी जाण्याच्या तयारीत असले बाबत बातमी मिळाली होती.
सदर बातमीच्या अनुषांगाने लागलीच गुन्हे शाखा, युनिट ४, पुणे शहर कडील पथकाने संगमवाडी पार्किंग क्र. ०३ येथे जावून शिताफिने वाल्मिक संजय पाटील (वय ३१ वर्षे, रा. माळीवाडा, अमलेश्वरनगर, ता. अंमळनेर, जि. जळगाव) यास ताब्यात घेतले. त्याचे कब्जात एकुण रु.८,४८,६५०/- एवढी रोख रक्कम मिळून आली. सदर रकमेबाबत आरोपीकडे तपास केला असता त्याने सदरची रक्कम एस के पी कॅम्पस बालेवाडी पुणे येथिल ज्ञानग सागर इन्स्टयुट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च या ऑफिस मधुन चोरल्याचे सांगून गुन्हयाची कबुली दिली. दाखल गुन्हा उघडकीस आणून गुन्हयातील आरोपीस पुढील कारवाई कामी चतुःश्रृंगी पोलिस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले.
सदरची उल्लेखनिय कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, अपर पोलिस आयुक्त गुन्हे, रामनाथ पोकळे, पोलिस उप आयुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहा. पोलिस आयुक्त गुन्हे – २ सतीश गोवेकर, पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव यांचे मार्गदर्शनाखाली, सहा. पोलिस फौजदार शितल शिंदे, पोलिस अंमलदार विठ्ठल वाव्हळ, सारस साळवी, प्रविण भालचिंग, वैभव रणपिसे, यांनी केली आहे.
पुणे शहरात भाजप आमदाराची अजित पवार यांच्यासमोरच पोलिसाला मारहाण…
कुख्यात गुंड शरद मोहोळ प्रकरण! पोलिसांनी आवळल्या आठही जणांच्या मुसक्या…
पोलिसकाकावर हात उचलणं भाजप आमदार सुनील कांबळे यांना भोवलं…
वाघोलीमध्ये मुलीचा खून करणाऱ्या बापास युनिट ६ने तीन तासात केली अटक…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

