महाराष्ट्र हादरला! एकाच कुटुंबातील तिघांची गळा चिरून हत्या…

गडचिरोली : एकाच कुटुंबातील तिघांची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुंडापुरीमध्ये (ता. भामरागड) घडली आहे. मृतांमध्ये आजी, आजोबांसह नातीचा समावेश आहे. संपत्तीच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

देवू दसरू कुमोटी (वय ६०), बिच्चे देवू कुमोटी (वय 55, दोघे राहणार गुंडापुरी ता. भामरागड) आणि अर्चना रमेश तलांडे (वय दहा, राहणार येरकल तालुका एटपल्ली) अशी हत्या झालेल्या तिघांची नावे आहेत.

देवू कुमोटी यांची विवाहित मुलगी एटापल्ली तालुक्यात राहाते, त्यांची मुलगी अर्चना ही दिवाळीच्या सुट्टीमध्ये आपल्या आजी-आजोबांकडे आली होती. या घटनेत तिचाही मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. तिघांचे गळा चिरलेल्या अवस्थेमधील मृतदेह घरात आढळून आल्यानंतर खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कुटुंबातील ५ नव्हे तर १६ जणांच्या हत्येचा होता दोघींचा कट…

प्रेमविवाहानंतर नवऱ्यासह पाच जणांचा काढला काटा; गूढ उकलले…

भीषण अपघात! रिक्षावर ट्रक उलटून चार जणांचा जागीच मृत्यू…

ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची मध्यरात्री हत्या; नदीवर अंघोळ केली अन्…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!