
चंदननगर पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या सराईतास केली अटक…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरातील चंदननगर हद्दीत रात्रीच्या वेळी घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. चंदननगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत.
२२/१०/२०२३ रोजी रात्रौ ०१.०० वा ते २२.०० वा चे दरम्यान अज्ञात आरोपी यांनी सी जी मार्केटिंग प्रा लि कंपनीचे बँच, चंदननगर, पुणे याचे लोखंडी जाळीचे गेट कशाचे तरी सहाय्याने वाकवुन त्याचे खालुन प्रवेश करुन नोकीया कंपनीचा मोबाईल व सॅमसंग कंपनीचे ४ टॅब चोरुन नेल्याने चंदननगर पोलिस स्टेशन गु.रजि.नं.४९६/२०२३, भा.दं.वि. ३८०,४५४,४५७ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना तपास पथकातील पोलिस शिपाई ८३८१ विकास कदम, पोशि ३९३३ सुरज जाधव व पोशि ४३५२ श्रीकांत कोद्रे यांनी तांत्रिक विश्लेषणाचे आधारे व सुमारे २५० सीसीटीव्ही ची पाहणी करुन घरफोडीचे रेकॉर्डवरील गुन्हेगार मायकल नवनाथ कांबळे (वय २८ वर्षे, रा. लेन नं.४, गोकुळनगर, कात्रज, पुणे) व शिवा गोविंद चव्हाण (वय १९ वर्षे, रा. लेन नं. ४, गोकुळनगर, कात्रज, पुणे) यांना ताब्यात घेतले असता, त्यांचे ताब्यात गुन्ह्यातील चोरीस गेलेले २ टॅब व १ मोबाईल असा एकुण १४,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने ते जप्त करण्यात आलेले आहेत. त्यांच्याकडे इतरही चोरीचे ४ मोबाईल मिळून आलेले असुन त्याचा अधिक तपास करुन पुढील कारवाई चालू आहे. सदरचे आरोपी हे दिवसा फिरुन पाळत ठेऊन रात्रीचे वेळेस घरफोडी करत होते.
दरची कारवाई अपर पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा, पोलिस उप आयुक्त शशिकांत बोराटे, संजय पाटील, सहा. पोलिस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली व राजेंद्र लांडगे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, चंदननगर पोलिस स्टेशन, पुणे शहर, मनिषा पाटील, पोलिस निरीक्षक, गुन्हे, चंदननगर पोलिस स्टेशन, पुणे शहर यांचे दिमतीत तपास पथकाचे सपोनि प्रशांत माने, पोउपनिरी अरविंद कुमरे, पोउनि प्रमोद हंबीर, पोहवा २११५ दिलावर सय्यद, पोलिस नाईक ७३२९ शिवा धांडे, पोलिस शिपाई ८३६१ विकास कदम, पोलिस शिपाई ८५६३ गणेश हंडगर, पोलिस शिपाई ८३१८ सुभाष आव्हाड, पोलिस शिपाई ४३५२ श्रीकांत कोद्रे, पोलिस शिपाई ३९३३ सुरज जाधव यांनी केली आहे.

चंदननगर पोलिसांनी २५० सीसीटीव्ही तपासून आरोपीस केली अटक…
पुणे शहरात लष्करातील निवृत्त कर्मचाऱ्याचा कारच्या धडकेत मृत्यू…
पुणे हादरले! एकटेपणाला कंटाळून आजोबांनी घेतला जगाचा निरोप…
पुणे शहरात भोंदू बाबा म्हणाला पैशांचा पाऊस पाडतो अन् अचानक…
पुणे शहरात व्हिडीओ whatsapp ग्रुपला टाकून रिक्षाचालकाने उचलले मोठे पाऊल…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

