पत्नीने माजी सैनिक पतीच्या छातीत खुपसला चाकू अन् घेतला जीव; कारण समोर…

अहमदाबाद (गुजरात): अहमदाबाद येथील एका महिलेने आपल्या माजी सैनिक पतीची चाकूने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिलीप खराडी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते निवृत सैनिक होते. सैन्यातून निवृत झाल्यानंतर ते चालक म्हणून काम करत होते. त्यांच्या पत्नीचे नाव निर्मला असे आहे. ते आपली पत्नी आणि दोन मुलांसोबत राहत होते.

दिलीप आणि त्यांच्या पत्नीमध्ये जेवणात कोणती भाजी बनवली यावरून वाद झाला. या वादादरम्यान, निर्मलाने स्वयंपाकघरातील चाकू उचलला आणि दिलीप यांच्या छातीच्या डाव्या बाजूला वार केला. हा वार थेट हृदयाच्या वरच्या भागात लागल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली. हल्ल्यानंतर निर्मलाने तिच्या दीराला फोन करून दिलीप यांच्यावर झालेल्या चाकू हल्ल्याची माहिती दिली. त्यानंतर तिने तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

दिलीप आणि त्यांची पत्नी निर्मला यांच्यात गेल्या काही काळापासून घरगुती आणि आर्थिक कारणावरून वारंवार वाद होत होते. 6 नोव्हेंबरच्या रात्री जेवणात कोणती भाजी बनवली यावरून दोघांमध्ये वाद झाला. याच वादाच रूपांतर जोरदार भांडणात झाले. दिलीप यांच्या वडीलांनी नारोडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीसांनी निर्मलाला ताब्यात घेतले असून, हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

दरम्यान, दिलीप आणि निर्मला यांना दोन मुले आहे. दिलीप यांचा मृत्यू झाला असून निर्मला पोलीसांच्या ताब्यात आहे. त्यामुळे दोन्ही मुलांवर मोठं संकट ओढवले आहे.

पायल झांबरे मृत्यू प्रकरण! घरातून सोने, चांदीचे दागिने, मोबाईलसह सीसीटीव्ही फुटेज जप्त अन्…

पत्नीची चारित्र्याच्या संशयातून हत्या अन् नवऱ्याची आत्महत्या; मुलं झाली पोरकी…

नाशिक! बहिणीसोबत प्रेमसंबंध असलेल्या युवकाला स्मशानभूमीजवळ बोलावले अन्…

मानवी क्रौर्याची परिसीमा; कॅब चालकाने केली पत्नी, मुलासह सासरच्या ७ जणांची निर्घृण हत्या; नंतर त्याने काय केले…

नेपाळमधील युवतींसोबत व्यापाऱ्याची ओळख; प्रेम, खासगी व्हिडिओ अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!