‘खाकी’वर शोककळा! पोलिस कर्मचाऱ्याला ट्रकने उडवले अन्…

भंडारा : भंडारा जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास गस्त घालत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. याममध्ये पोलिस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. किशोर हटवार असे मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून, या घटनेमुळे पोलिस दल आणि परिसरात शोककळा पसरली आहे.

भंडारा जिल्ह्यातील कोरंभी बायपास रोडवर रात्रीच्या सुमारास भंडारा वाहतूक शाखेचे पथक गस्तीचे काम करत होते. यादरम्यान वाहतूक शाखेची गाडी थांबलेली असताना पोलिस कर्मचारी रस्त्यावर उभे होते. यावेळी एका ट्रॅक्टर चालकाला थांबवून पोलिस कर्मचारी त्याची विचारपूस करत होते. त्याच वेळी मागून अत्यंत भरधाव वेगाने आलेल्या एका आयसर ट्रकने रस्त्यावर उभ्या असलेल्या पोलिस आणि ट्रॅक्टर चालकाला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, पोलिस कर्मचारी किशोर हटवार यांचा जागीच मृत्यू झाला, तर ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

दरम्यान, अपघात घडल्यानंतर ट्रॅक्टर आणि पोलिसांच्या गाडीला धडक देणारा आयसर ट्रकचा चालक घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच इतर पोलिस अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गंभीर जखमी असलेल्या ट्रॅक्टर चालकाला तातडीने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले, जिथे त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. कर्तव्य बजावत असताना एका प्रामाणिक पोलिस कर्मचाऱ्याचा अशा प्रकारे अपघाती मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, फरार ट्रक चालकाचा शोध पोलिस घेत आहेत.

गो तस्करांच्या हल्ल्यात पोलिस कर्मचारी जखमी…

पोलिस मुख्यालयात जाताना अपघातात महिला पोलिसाचा मृत्यू…

नाशिक पोलिस दलातील बडतर्फ पोलिसाचा लॉजवर संशयास्पद मृत्यू…

महिला पोलिस स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू; बहिणीचा गंभीर आरोप…

पोलिसांच्या गाडीला ट्रकने दिली धडक; पोलिसकाकाचा मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!