पुणे! ‘किंग इज बॅक’ असं स्टेट्स ठेवलं अन् सपासप वार…

पुणे : एका व्हॉट्सॲप स्टेटसवरून एका अल्पवयीन मुलावर कोयत्यानं सपासप वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना तळेगाव दाभाडे येथे घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलावर हल्ला करणारेही अल्पवयीन आहेत. पोलिसांनी या चार अल्पवयीन मुलांना काही तासांतच ताब्यात घेतले आहे. हल्ल्यात जखमी झालेला मुलगा एका कपड्याच्या दुकानात काम असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वराळे येथे ३० ऑगस्ट रोजी खून झाला होता. ज्या मुलावर हल्ला झाला त्याच्या मामाचा मुलगा आणि त्याचा मित्र नुकतंच या खुनाच्या गुन्ह्यानंतर बालसुधारगृहातून सुटून आले होते. यानंतर या मुलाने ‘किंग इज बॅक’ असे स्टेट्स ठेवले होते. याचाच राग आल्यानं चार अल्पवयीन मुलांनी त्याला गाठले आणि त्याच्यावर कोयत्याने हल्ला करण्यास सुरुवात केली. मुलाच्या डोक्यात आणि पाठीवर कोयत्याने सपासप वार करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले. यात मुलाच्या उजव्या हाताचा अंगठाही तुटला. संबंधित हल्ल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

दरम्यान, शेजारीच एका दुकानातील ओळखीच्या व्यक्तीने मुलाला डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी लगेचच तपासाची चक्रं फिरवली. यानंतर काही तासातच दोन मुलांना वराळे येथून तर इतर दोघांना तळेगाव दाभाडेमधून ताब्यात घेण्यात आले. चौकशीनंतर या चौघांचीही बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. मात्र, अल्पवयीन मुलांमध्ये घडलेल्या या रक्तरंजित थरारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पुणे जिल्ह्यात युवकाची सपासप वार करून निर्घृण हत्या; थरार CCTV कॅमेऱ्यात कैद…

पुणे! गुंड निलेश घायवळ टोळीतील टोळक्याने केले युवकावर सपासप वार…

Video: पुणे शहरात युवकावर कोयत्याने सपासप वार, पुलावरून खाली पडला अन्…

पुणे शहरात किरकोळ वादातून युवकाची सपासप वार करून हत्या…

Video: पुणे शहरात भरदिवसा युवकावर कोयत्याने सपासप वार…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!