
सातारा! महालक्ष्मीच्या दर्शनाला गेलेल्या चार मित्रांचा अपघाती मृत्यू; पाहा नावे…
सातारा: कराड शहराजवळ पुणे-बेंगलोर महामार्गावर उड्डाणपूलावर मंगळवारी (ता. २०) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास स्कॉर्पिओ आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये साताऱ्यातील चार युवकांचा जागीच मृत्यू झाला असून, तीन जण जखमी झाले आहेत.
अपघातातील सर्व युवक कोल्हापूरच्या महालक्ष्मीला दसऱ्यानिमित्ताने दर्शनाला गेले होते. त्यानंतर घरी परत येत असताना हा भीषण अपघात झाला आहे. अपघातातील सर्व युवक साताऱ्यातील खटाव तालुक्यातील कातरखटाव गावचे आहेत. या दुर्घटनेमुळे कातरखटाव गावावर शोककळा पसरला आहे. जखमींवर कराडच्या कृष्णा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
View this post on Instagram
कराड शहराजवळ उभारलेल्या नवा सहापदरी उड्डाणपूल काही दिवसापूर्वीच वाहतुकीस खुला केला असून हा पहिलाच भीषण अपघात आहे. अपघात इतका भीषण होता की, स्कॉर्पिओ कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. तेजस देशमुख (चालक, वय 25 वर्षे), सागर निंबाळकर (वय 23 वर्षे), सुयश चिंचकर (वय 20 वर्षे) आणि रोहित धोत्रे (वय 21 वर्षे) अशी अपघातात मृत पावलेल्या चार मित्रांची नावे आहेत. तर ऋतुराज दुबळे (वय 21 वर्षे), शंतनू शिंगाडे (वय 20 वर्षे) आणि अमन तांबोळी (वय 23 वर्षे) अशी जखमी मित्रांची नावे आहेत.
तुळजापूरला देवीची ज्योत आणायला गेलेल्या तीन युवकांचा अपघाती मृत्यू…
हृदयद्रावक! पैठणमध्ये भीषण अपघात बाप-लेकीसह तिघांचा मृत्यू…
समृद्धी महामार्गावरून दुर्गादेवीची मूर्ती घेऊन जाताना भीषण अपघात; सात जणांचा मृत्यू…
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमवर शोककळा; लेखकाचे अपघाती निधन…
पोलिस मुख्यालयात जाताना अपघातात महिला पोलिसाचा मृत्यू…

