विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या संशयावरून पोलादपूरमध्ये पतीस अटक; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल…

पोलादपूर: रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मुरलीधर दरेकर यांची सून गार्गी गणेश दरेकर हिने कोतवाल बुद्रुक येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पोलादपूर पोलिस ठाण्यात पती गणेश मुरलीधर दरेकर याच्यासह अन्य चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश दरेकर याला अटक करण्यात आली असून, महा़डच्या न्यायालयात हजर करण्यात आले, अशी माहिती पोलादपूर पोलिसांनी दिली.

गणेश दरेकर घराबाहेर गेला असताना सून गार्गी हिने अज्ञात कारणावरून गळफास लावून घेतल्याने तिचा मृत्यू झाला. यावेळी विवाहितेचा भाऊ प्रथमेश दळवी याने बहिणीचा मृतदेह पाहून पोलादपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

मृत गार्गीच्या मृत्यूप्रकरणी आरोपी पती गणेश मुरलीधर दरेकर, मुरलीधर दरेकर, मनीषा दरेकर, मुन्नी पार्टे, श्रीकांत पार्टे यांनी शारीरिक, मानसिक तसेच वेळोवेळी पैशांची मागणी करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असल्याचे, पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!