महिला पत्रकाराच्या कथित विनयभंगाविरोधात आता सीजेपीची आघाडी; एसीपी विवेक भगत यांच्यावर कारवाईची मागणी…

नवी दिल्लीः एसीपी विवेक भगत यांनी एका महिला पत्रकाराचा विनयभंग केल्याच्या आरोपांवरून, कॉकरोच जनता पक्षाने (सीजेपी) निषेध नोंदवला आहे. सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून दावा केला आहे की, पोलीस पीडितेला भेटण्यास तयार नाहीत.

या पोस्टमध्ये सौरभ दास यांनी म्हटले आहे की, पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनबाहेर सीजेपीचे सदस्य उपस्थित होते. एसीपी विवेक भगत यांच्याकडून कथितपणे विनयभंग झालेल्या महिलेला भेटण्यास पोलीस तयार नव्हते. हे कदापी मान्य होणार नाही आणि जोपर्यंत पोलीस त्यांना आत प्रवेश देत नाहीत तोपर्यंत ते पोलीस ठाण्याबाहेर उभे राहतील, असे त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे.

संपूर्ण घटनेवर स्पष्टीकरण देताना, दिल्ली पोलिसांनी त्यांच्या एक्स हँडलवर पोस्ट करून लिहिले की, ३ ऑक्टोबर २०२६ रोजी, नवी दिल्ली परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती असताना झालेल्या एका आंदोलनादरम्यान, तीन महिला पत्रकारांनी पोलीस अधिकाऱ्यांवर लैंगिक छळाचा आरोप केला.

नवी दिल्ली जिल्हा पोलिसांना तिघांकडूनही तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यांनी त्या निष्पक्ष आणि स्वतंत्र तपासासाठी गुन्हे शाखेकडे सोपवल्या आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गुन्हे शाखा या तक्रारींचा तपास करेल. या प्रकरणातील आरोपांची चौकशी झाल्यानंतरच परिस्थिती स्पष्ट होईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!