पुणे शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठे बदल…

पुणे: पुणे शहरात गणेशोत्सवाच्या काळात होणारी प्रचंड गर्दी आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता पुणे शहर वाहतूक पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव काळात नागरिकांची सुरक्षितता जपण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्त्यांवर जड व अवजड वाहनांना २४ तास प्रवेशबंदी लागू केली आहे.

पुणे शहरात गणेशोत्सव काळात गणपतीचे देखावे पाहण्यासाठी, पूजा साहित्य व खरेदीसाठी पुणे शहरासह राज्यभरातून लाखो भाविक आणि पर्यटक मध्यवर्ती भागात मोठ्या संख्येने एकत्र येतात. अशा वेळी रस्त्यांवरून धावणाऱ्या जड आणि अवजड वाहनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो, तसेच अपघातांची शक्यता वाढते. नागरिकांना कोणत्याही अडथळ्याविना देखावे पाहता यावेत आणि वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी वाहतूक पोलिसांनी १२ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर या कालावधीत मध्यवर्ती भागातील रस्त्यांवर जड वाहनांना २४ तास बंदी घालण्याचा आदेश दिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

पुणे शहरातील १२ प्रमुख मार्गांवर २४ तास जड वाहनांना बंदी…
१) शास्त्री रोड: सेनादत्त चौकी चौक ते अलका टॉकीज चौक
२) टिळक रोड: जेधे चौक (स्वारगेट) ते अलका टॉकीज चौक
३) कुमठेकर रोड: शनिपार ते अलका टॉकीज चौक
४) लक्ष्मी रोड: संत कबीर चौक ते अलका टॉकीज चौक
५) केळकर रोड: फुटका बुरुज ते अलका टॉकीज चौक
६) बाजीराव रोड: पुरम चौक ते गाडगीळ पुतळा
७) शिवाजी रोड: गाडगीळ पुतळा ते जेधे चौक
८) कर्वे रोड: नळस्टॉप चौक ते खंडोजीबाबा चौक
९) फर्ग्युसन कॉलेज (FC) रोड: खंडोजीबाबा चौक ते वीर चाफेकर चौक
१०) जंगली महाराज (JM) रोड: स. गो. बर्वे चौक ते खंडोजीबाबा चौक
११) सिंहगड रोड: राजाराम ब्रिज ते सावरकर चौक
१२) गणेश रोड / मुदलियार रोड: पॉवर हाऊस, दारूवाला पूल, जिजामाता चौक ते फुटका बुरुज चौक

दरम्यान, पोलीस प्रशासनाचे नागरिकांना सहकार्याचे आवाहन गणेशोत्सवाचा हा सण अत्यंत उत्साहात आणि शांततेत पार पाडण्यासाठी सर्व वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांनी केलेल्या या नियमांचे आणि बदलांचे तंतोतंत पालन करावे. तसेच मध्यवर्ती भागात येणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पुणे शहर वाहतूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

पुणे पोलिस आयुक्त उतरले थेट रस्त्यावर, गणेश मंडळांना भेटी अन् सूचना…

Video! पुणे शहरात MPSCच्या विद्यार्थ्याचे मैत्रिणीच्या प्रियकरानं केले अपहरण अन्…

पुणे! विद्यानंद बापट यांना मारहाण करणारा नेमका कोण? महत्त्वाची माहिती समोर…

पुणे शहरात विद्यानंद बापट यांना मारहाण! म्हणाले, घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!