
पुणे! प्रेमाच्या त्रिकोणातून नवविवाहितेची गळफास घेत आत्महत्या…
पुणे : नवऱ्याचे दुसऱ्या महिलेसोबत असलेले अनैतिक संबंध आणि त्यातून मिळणाऱ्या शारीरिक-मानसिक त्रासाला कंटाळून नवविवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे.
सोनाली गोविंद पवार (वय २५, रा. सुतारदरा, कोथरूड) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. तिच्या मृत्यूनंतर कोथरूड पोलिस ठाण्यात पती गोविंद पवार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली आणि गोविंद यांचा विवाह काही महिन्यांपूर्वीच मोठ्या उत्साहात पार पडला होता. गोविंदचे दुसऱ्या एका महिलेसोबत विवाहबाह्य संबंध सुरू असल्याची माहिती सोनाली यांना समजली. पतीच्या या अनैतिक संबंधांची माहिती मिळताच नवविवाहित दाम्पत्यामध्ये भांडणे होऊ लागली.
View this post on Instagram
कोथरूडमधील सुतारदरा (लेन क्रमांक २९) येथील राहत्या घरी कोणी नसताना, जाचाला कंटाळलेल्या सोनाली यांनी २२ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास साडीच्या साहाय्याने छताला गळफास लावून घेतला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत सोनालीची प्राणज्योत मालवली होती. याप्रकरणी पती गोविंद पवार याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे जिल्ह्यात युवकाला पत्नी अन् मुलासमोरच संपवल्याचं कारण आलं पुढे; प्रेमसंबंध…
पुणे! प्रेमविवाह केल्यानंतर नवऱ्याचे अनैतिक संबंध पत्नीला समजले अन्…
पुणे! आळंदीतील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा; सोशल मीडियावर ओळख; प्रेमविवाह अन्…
पुणे! प्रेमप्रकरणातून महिलेची आत्महत्या; कागदाचे तुकडे जोडत पोलिसांनी उकललं गूढ…
पुणे! प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुलगी राहिली गर्भवती अन् ससूनमध्ये…

