पुणे! ‘माझ्या गर्लफ्रेंडकडे का पाहतोस? एक्स बॉयफ्रेंडवर कोयत्यानं हल्ला…

पुणे : पुणे शहरातील येरवडा परिसरामध्ये एका प्रेमप्रकरणातून भररस्त्यात युवकावर अत्यंत जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. ‘माझ्या गर्लफ्रेंडकडे का पाहतोस?’ या संशयातून झालेल्या या राड्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

येरवड्यातील गोल्फ क्लब रोडवरील नेताजी चौकात ही थरारक घटना घडली. एका युवतीच्या प्रेमप्रकरणावरून हा सर्व प्रकार घडल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संशयित मुलाने जुन्या प्रियकराचा पाळत ठेवून पाठलाग केला. त्याला रस्त्यात गाठत आपल्या साथीदारांच्या मदतीने त्याच्यावर धारदार शस्त्र आणि दांडक्यांनी बेदम हल्ला चढवला. अचानक झालेल्या हल्ल्याने परिसरात मोठी दहशत निर्माण झाली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

दरम्यान, हल्ला केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून तातडीने पसार झाले. घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमी युवकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले जात असून पसार झालेल्या अल्पवयीन हल्लेखोरांचा पोलीस शोध घेत आहेत.

पुणे! ‘अरे तू, पोरींना काय बोलला. आमच्याबरोबर चल…’, रिल स्टार अटकेत…

पुणे! प्रेमविवाह केल्यानंतर नवऱ्याचे अनैतिक संबंध पत्नीला समजले अन्…

पुणे! प्रेमप्रकरणातून महिलेची आत्महत्या; कागदाचे तुकडे जोडत पोलिसांनी उकललं गूढ…

पुणे! आळंदीतील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा; सोशल मीडियावर ओळख; प्रेमविवाह अन्…

पुणे! आईने स्वतःचं प्रेमप्रकरण लपविण्यासाठी प्रियकराला मुलीसोबत ठेवायला लावले अनैतिक संबंध…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!