विवाहितेने प्रियकराच्या मदतीने काढला नवऱ्याचा काटा, सीसीटीव्हीने भांडाफोड…

हैदराबाद (आंध्र प्रदेश) : अमावस्येनिमित्त देवदर्शनासाठी मंदिरात जाण्याचा बहाणा करत विवाहिता आणि तिच्या प्रियकराने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना चित्तूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. सीसीटीव्ही फूटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी काही तासातच याचा उलगडा केला.

रमेश (वय २३) असे मृत युवकाचे नाव आहे. तो तामिळनाडूतील कृष्णगिरी जिल्ह्यातील सुलागिरी भागातील रहिवासी होता. रमेश होसूरमधील एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. त्याचा विवाह दोन वर्षांपूर्वी हसिनीशी (वय १९) झाला होता. ती शांतीपुरम भागातील बोयानपल्ली गावची रहिवासी होती. त्यांना लहान मुलगीही आहे. हसिनीचे २० वर्षीय बालमित्र युगंधर याच्यासोबत दीर्घकालीन प्रेमसंबंध सुरु होते. हसिनीच्या लग्नानंतरही ते सुरुच राहिले. नात्यात अडथळा ठरणाऱ्या रमेशचा काटा कायमचा काढण्याचा निर्णय दोघांनी घेतला.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

“हसिनीने मंगळवारी मल्लप्पा कोंडा डोंगरावरील श्री मल्लेश्वर स्वामी मंदिराला भेट देण्यासाठी रमेशला तयार केले. प्रवासादरम्यान ती आपलं लाईव्ह लोकेशन फोनवरुन युगंधरला सतत कळवत होती. यामुळेच हल्लेखोरांना त्यांच्या हालचालींचा माग घेणे शक्य झाले” असे पोलिसांनी सांगितले. डोंगराळ रस्त्याच्या तिसऱ्या वळणावर त्यांनी कट प्रत्यक्षात उतरवला. हसिनीने जाणूनबुजून तिची बॅग पाडली. त्यामुळे रमेशला दुचाकी थांबवावी लागली. त्याचवेळी लपून बसलेले युगंधर आणि त्याचे साथीदार बाहेर आले. त्यांनी रमेशचा जंगलात १०० मीटरपर्यंत पाठलाग केला. धारदार शस्त्रांनी वार करुन त्याची हत्या केली. हत्येवेळी त्यांची चिमुकली जवळच होती.

आपली मुलगी आणि नात घरी परत न आल्यामुळे हसिनीच्या आईने पोलिसांशी संपर्क साधला, तेव्हा या गुन्ह्याचा उलगडा झाला. मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता, त्यात रमेश आपल्या पत्नीसह दुचाकीवरुन मंदिराकडे जाताना दिसला, मात्र नंतर हसिनी पतीच्याच बाईकवरुन अन्य दोन पुरुषांसह त्या परिसरातून निघून जाताना दिसल्याने संशय आला. पोलिसांनी फोन रेकॉर्ड, लोकेशन डेटा आणि इतर तांत्रिक पुरावे तपासले असता जंगलात रमेशची बॉडी सापडली. या प्रकरणी पोलिसांनी पत्नी हसिनी, तिचा प्रियकर युगंधर आणि इतर दोन साथीदारांना अटक केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

प्रियकराच्या सांगण्यावरून नर्सने केला नवऱ्याचा सलाईनमधून क्रुर मर्डर…

सांगली! प्रेमविवाहानंतर रात्रीच्या सुमारास दुसऱ्या प्रियकराला घरी बोलवलं अन्…

सातारा! अपघात नव्हे तर घातपात; प्रियकरासोबत राहण्यासाठी पतीचा काढला काटा…

विवाहबाह्य संबंध अन् ‘कार्यक्रम ओके’ म्हणून प्रियकराचा फोन…

पुणे हादरलं! प्रेयसीनंच फिल्मी स्टाईलने केलं प्रियकराचं अपहरण; कारण…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!