
महिला पोलिस अंमलदाराच्या मोबाईलवर पाठवला अश्लील मेसेज…
सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका महिला पोलिस अंमलदार यांच्या मोबाईलवर अश्लील मेसेज पाठवून विनयभंग केल्याप्रकरणी एका पोलिस नाईक विरुद्ध जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सोलापूर पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. विनायक सुर्यवंशी (नेमणूक- पोलिस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिस नाईक आरोपीचे नाव आहे.
View this post on Instagram
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला पोलिस अंमलदार (वय २६) या सोलापूर ग्रामीण पोलिस मुख्यालय वस्तीगृह येथे राहतात. 21 डिसेंबर 2025 ते 15 जुलै 2026 या कालावधीत, महिला पोलिस अंमलदार या कर्तव्यावर असताना तसेच त्यांच्या राहत्या घरी असताना, आरोपी पोलिस नाईक विनायक सुर्यवंशी याने त्यांचा प्रत्यक्ष आणि मोबाईलद्वारे सातत्याने पाठलाग केला. एवढेच नव्हे तर, आरोपीने त्यांना मोबाईलवर अत्यंत अश्लील मेसेज पाठवून त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिला पोलिस अंमलदाराने स्वतः जेलरोड पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.
पीडितेच्या फिर्यादीवरून जेलरोड पोलिस ठाण्यात आरोपी विनायक सुर्यवंशी याच्याविरुद्ध BNS (भारतीय न्याय संहिता) कलम 75 आणि 78 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस उपआयुक्त प्रितम यावलकर यांनी तातडीने जेलरोड पोलिस ठाण्याला भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास जेलरोड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पाटील हे करत आहेत.
PSI चा विवाहित शिक्षिकेवर वारंवार अत्याचार; माझे तिच्यावर प्रेम…
पोलिसाचे धावत्या कारमध्येच अश्लिल चाळे अन् Video झाला व्हायरल…
DCP आणि ACP दर्जाच्या दोन महिला पोलिस अधिकारी अशोक खरातच्या संपर्कात…
प्रसिद्ध अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लिल चॅट व्हायरल, विवस्त्र व्हिडीओ कॉल…

