
Cyber Crime! नात्याचा मुखवटा घालून आला आणि घात केला…
पुणे : व्हॉट्सअॅप कॉलवरुन स्वत:ला जवळचा नातेवाईक असल्याचे भासवत एका भामट्याने वृद्ध आजोंबाची लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना हडपसर भागात घडली आहे. हडपसर पोलिसांनी संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
हडपसर भागातील मगरपट्टा येथे राहत असलेल्या धरमपाल हरीशरण पावा (वय ७८) यांच्या सोबत फसवणूकीची घटना घडली आहे. त्यांनी हडपसर पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेला माहितीनुसार, संबंधित प्रकार 2 जानेवारी 2024 ते 7 एप्रिल 2026 या दरम्यान घडला आहे.
तक्रारदार धरमपाल यांना एका वेगळ्या नंबरवरुन व्हॉट्सअॅप कॉल आला होता. समोरील अज्ञात व्यक्तीने अतिशय हुशारीने पावा यांच्याशी संवाद साधण्यास सुरुवात केली आणि तो त्यांच्या जवळचा नातेवाईक असल्याचे त्यांना पटवून दिले. त्यानंतर आरोपीने त्यांना सांगितले की, तो सध्या परदेशात असून त्याला स्वत:च्या व्हिसा प्रक्रियेसाठी तातडीने काही पैसे भरायचे आहेत. पण नियमांनुसार व्हिसा एजंटला थेट पैसे देता येत नाही, त्यामुळे धरमपाल यांना मध्यस्ती करण्यास सांगितले. शिवाय, आरोपीने दिलेल्या विविध बँक खात्यावर पैसे देण्यास सांगितले.
View this post on Instagram
आपल्या नातेवाईकाला मदत करण्यासाठी धरमपाल यांनी कोणतीही चौकशी न करता विविध वेळी तब्बल 5 लाख 96 हजार रुपयांची रक्कम आरोपीने सांगितलेल्या बँक खात्यात ट्रान्सफर केली. त्यानंतर बरेच दिवस गेले. मात्र समोरुन कोणताही संपर्क झाला नाही. तेव्हा धरमपाल यांना संशय आला. धरमपाल यांनी त्यांच्या इतर नातेवाईकांकडे चौकशी केली. तेव्हा असा कोणताही कॉल त्यांनी केला नसल्याचे सांगितले. त्याच वेळी आपली फसवणूक झाल्याची समजताच त्यांनी तातडीने सायबर पोलिसांकडे धाव घेतली. हडपसर पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेऊन पोलिस बँक खात्यांच्या आधारे आरोपीचा तपास सुरू केला आहे.
Cyber Crime! पुणे शहरातील सर्वात मोठा सायबर फसवणुकीचा प्रकार उघडकीस…
Cyber Crime! पुणे शहरातील नागिरकांना आमिष दाखवत 97 लाखांची फसवणूक…
Cyber Crime! पुणे सायबर पोलिसांनी आंतरराष्ट्रीय टोळीचे नेटवर्क केले उद्ध्वस्त…
Cyber Crime! पुणे शहरातील ज्येष्ठ नागरिकाची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणारे ताब्यात…

