कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी पोलिस ठाणे नव्या दिमाखदार वास्तूत; उद्घाटन सोहळा उत्साहात…

पुणे (संदीप कद्रे): कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी परिसरातील नागरिकांची सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आमदार योगेश टिळेकर यांच्या विशेष प्रयत्नांतून साकार झालेल्या, नव्याने निर्माण केलेल्या कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी पोलीस ठाण्याच्या सुसज्ज इमारतीचा भव्य उद्घाटन सोहळा मंगळवारी (ता. १६) अत्यंत उत्साहपूर्ण आणि ऐतिहासिक वातावरणात संपन्न झाला.

कोंढवा बुद्रुक आणि येवलेवाडी परिसराचा वेगाने होणारा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता, येथे स्वतंत्र व सुसज्ज पोलिस ठाणे असावे यासाठी आमदार योगेश टिळेकर सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला आहे. नागरिकांना अधिक प्रभावी, वेगवान आणि पारदर्शक सेवा देण्याच्या उद्देशाने या नव्या पोलिस ठाण्याची उभारणी करण्यात आली आहे. सर्व आधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज असलेल्या या इमारतीमुळे पोलिस प्रशासनाला अधिक सक्षमपणे काम करता येणार असून, स्थानिक महिला, व्यावसायिक आणि नागरिकांमध्ये सुरक्षेचे वातावरण निर्माण होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

सोहळ्याला पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह अनेक वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि राजकीय क्षेत्रातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते. पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, ‘राज्य शासनाने पुणे शहराच्या सुरक्षेसाठी १२ नवीन पोलिस ठाण्यांना मंजुरी दिली असून ८०० नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. तसेच ड्रग्सविरोधी मोहीम, रात्री १० नंतर अनधिकृत आस्थापनांवर कडक कारवाई आणि ११२ आपत्कालीन सेवेचा वेगवान प्रतिसाद यावर पोलिस दल विशेष भर देत आहे. ‘सक्षम प्रशासन, सुरक्षित परिसर आणि जनतेचा विश्वास’ या ध्येयाने प्रेरित होऊन आमदार योगेश अण्णा टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला हा विकासकामांचा धडाका नागरिकांसाठी अत्यंत दिलासादायक ठरत आहे.’

पुणे पोलिसांचा १७ तासांचा थरार; आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश…

पुणे पोलिसांनी 70 कॅमेरे तपासले अन् चिमुकलीची केली सुटका; पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव…

पुणे पोलिस आयुक्तालयांतर्गत होणार पाच नवीन पोलिस ठाणी…

पुणे पोलिसांवरील ताण हलका होणार! मोठी पोलिस भरती…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!