पुण्यातील शाळांची विशिष्ट दुकानातून पुस्तके-गणवेश खरेदीची सक्ती? पोलिसांकडे तक्रार…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील काही नामांकित शाळांकडून विद्यार्थ्यांच्या पालकांना पुस्तके, गणवेश आणि इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातूनच खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी कोरेगाव पार्क येथील एका नागरिकाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करून चौकशी व कारवाईची मागणी केली आहे.

एका नागरिकाच्या तक्रारीनुसार, सेंट ॲन्स स्कूल, सेंट पॉल स्कूल, सेंट विल्सन स्कूल यांच्यासह एकूण 11 मान्यताप्राप्त शाळांकडून पालकांना पुस्तके व गणवेश केवळ एका विशिष्ट दुकानातूनच खरेदी करण्याचे निर्देश दिले जात आहेत. त्यामुळे पालकांना इतर विक्रेत्यांकडून साहित्य खरेदी करण्याचे स्वातंत्र्य नाकारले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासन आणि शिक्षण विभागाच्या विविध आदेशांनुसार कोणत्याही शाळेला विद्यार्थी अथवा पालकांना विशिष्ट दुकानातून शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याची सक्ती करता येत नाही. तरीही काही शाळा या नियमांकडे दुर्लक्ष करून एका विशिष्ट विक्रेत्याला प्राधान्य देत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

या प्रकारामुळे हजारो पालकांची आर्थिक पिळवणूक होत आहे. विशेष म्हणजे, संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही प्रभावी कारवाई झाली नसल्याने शाळा व्यवस्थापनाला अभय मिळाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. एकाच शाळेने खरेदीसाठी दोन-तीन दुकानांची नावे सुचविली असली तरी प्रत्येक दुकानामध्ये किंमत वेगवेगळी आकारली जात असून, नागिरकांची लुट सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

तक्रारदाराने संबंधित 11 शाळांचे व्यवस्थापन, जबाबदार पदाधिकारी तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या शिक्षण अधिकाऱ्यांविरुद्ध चौकशी करून प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच पालकांची दिशाभूल करून विशिष्ट दुकानाला आर्थिक लाभ मिळवून देण्याचा प्रकार झाला असल्यास भारतीय न्याय संहिता (BNS) आणि इतर लागू कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकता, पालकांचे अधिकार आणि शैक्षणिक साहित्याच्या विक्रीतील स्पर्धात्मक वातावरण याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

पुणे पोलिसांचा १७ तासांचा थरार; आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश…

पुणे! हिंजवडीमधील IT इंजिनिअरने संपवलं जीवन; चिठ्ठीत दोन महिलांचे नावे…

पुणे शहरात जड/अवजड वाहनांना प्रवेशबंदी; पाहा पर्यायी मार्ग…

पुणे जिल्ह्यात कडक जमावबंदी आदेश लागू; पाहा कधीपासून…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!