
नाशिक लैंगिक शोषण प्रकरणात निदा खानची सर्वात मोठी कबुली; खळबळजनक खुलासे…
नाशिक: IT TCS या कंपनीत काम करणाऱ्या गरजू मुलींना हेरून त्यांना लग्नाचं आमिष दाखवून त्यांचं लैगिंक शोषण आणि धर्मांतर केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानने आता सर्वात मोठी कबुली दिली आहे. तिने चौकशीदरम्यान अनेक खळबळजनक खुलासे केले आहे. यामुळे या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस कोठडीत असलेल्या निदा खानची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीत तिने आपला गुन्हा मान्य केला आहे. “होय, मीच पीडितेला माझ्या घरी घेऊन गेले होते आणि तिथे तिला नमाज पठणाचे प्रशिक्षण दिले” अशी स्पष्ट कबुली निदा खान हिने तपास यंत्रणांसमोर दिली आहे. एका नामांकित कंपनीत काम करणाऱ्या युवतीचं अशा प्रकारे ब्रेनवॉश करून तिला धर्मांतरासाठी प्रवृत्त केल्याच्या या कबुलीमुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
View this post on Instagram
नाशिक पोलिस अत्यंत गांभीर्याने या संवेदनशील प्रकरणाचा तपास करत आहेत. या रॅकेटचे धागेदोरे कुठेकुठे पसरले आहेत, याचा शोध तपास यंत्रणा घेत आहेत. या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत एकूण नऊ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सर्व गुन्ह्यांचा तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र देखील दाखल केले आहे. उद्यापासून म्हणजे ९ जूनपासून या प्रकरणी नियमित सुनावणी होणार आहे.
निदा खान हिच्या या थेट कबुलीमुळे हे प्रकरण केवळ लैंगिक छळापुरते मर्यादित नसून, यामागे एक मोठे संघटित धर्मांतर रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पीडित युवतीवर नेमका कसा दबाव आणला गेला? या कटात कंपनीतील किंवा बाहेरील आणखी किती लोकांचा सहभाग आहे? याचा सखोल तपास आता पोलिस करत आहेत.
नाशिक TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या…
नाशिक IT कंपनी अत्याचार प्रकरणात नवा ट्विस्ट; घटनाक्रम समोर…
नाशिक! TCS प्रकरणात धक्कादायक खुलासा, पासवर्ड अश्लील शब्दांचा अन्…
नाशिक! TCS कंपनीतील निदा खान हिच्या जामीन अर्जावर सुनावणीपूर्वीच धक्कादायक माहिती समोर…
नाशिकमधील धर्मांतर प्रकरणाची हादरवणारी कहाणी समोर…
नाशिक! TCS HR निदा खान हिने जामीन अर्जात दिली धक्कादायक माहिती…
नाशिकमधील लैंगिक अत्याचार प्रकरण! आयटी कंपनी TCS कडून मोठा निर्णय…
नाशिक! महिला पोलिस आयटी कर्मचाऱ्यांच्या वेशात गेल्या अन् केला भांडाफोड…
अशोक खरात प्रकरणातील आणखी एक धक्कादायक माहिती समोर…
नाशिक! बड्या IT कंपनीत नोकरी द्यायचे, मग रिसॉर्टवर नेऊन करायचे अत्याचार…
नाशिक! भोंदूबाबा अशोक खरात याच्या केबिनच्या काचा पाहून पोलिस थक्क…

