
कोल्हापूर! महाविद्यालयीन युवतीवर प्रियकरासह चौघांचा अत्याचार; Video बनवला अन्…
कोल्हापूर : एका १९ वर्षीय महाविद्यालयीन युवतीवर चार जणांनी वारंवार लैंगिक अत्याचार केला असून, आरोपींनी तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल १० महिने तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला आहे. याप्रकरणी मुरगुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चौघांना अटक केली आहे.
आदित्य बाजीराव शेटके (वय २४, रा. खिंडी व्हरवडे, ता. राधानगरी), रणजित संभाजी मुधोळकर (वय २१, रा. सोळांकुर, ता. राधानगरी) प्रणवगिरी चंद्रशेखर पालकर (वय २४, रा. राधानगरी) आणि विक्रम रामचंद्र पाटील (वय २२, रा. बुजवाडे, ता. राधानगरी) असे गुन्हा दाखल झालेल्या चार आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Discount Price : 165 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी आदित्य शेटके याच्या मामाचा सोळांकुर येथे फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंगचा व्यवसाय आहे. मामाने हा व्यवसाय आपला भाचा आदित्यला चालवण्यासाठी दिला होता. या व्यवसायाच्या निमित्ताने आदित्यची ओळख पीडित युवतीसोबत झाली. ओळखपत्र बनवून देण्याच्या बहाण्याने आदित्यने युवतीला मुदाळतिट्टा येथे बोलावून घेतले आणि नंतर मुरगुड येथील तलाव परिसरातील झाडीमध्ये नेले. तिथे तिचे फोटो काढून ते एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्याने पहिल्यांदा तिच्यावर अत्याचार केला.
पहिल्या अत्याचारानंतर मुख्य आरोपी आदित्यने या युवतीची ओळख त्याचा मित्र रणजित संभाजी मुधोळकर याच्याशी करून दिली. रणजितनेही फोटो व्हायरल करण्याची भीती दाखवत पीडितेला गिरगाव, कात्यायनी आणि कोल्हापूर परिसरातील विविध लॉजमध्ये नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. रणजितने तिची ओळख प्रणवगिरी पालकर याच्याशी करून दिली. प्रणवगिरीने तिला कारमधून एका लॉजमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर रणजितने तिची ओळख विक्रम रामचंद्र पाटील याच्याशी करून दिली. विक्रमने “तुझे पाठीमागील सर्व फोटो आणि व्हिडिओ डिलीट करून हे प्रकरण मिटवतो,” असे खोटं आश्वासन देऊन तिला पाचगाव येथील लॉजमध्ये नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला.
दरम्यान, चौघांनी मिळून गेल्या १० महिन्यांत युवतीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेने अखेर पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीची गंभीर दखल घेत, तातडीने कारवाई केली असून चारही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
कोल्हापूरमध्ये युवतींचे लैंगिक शोषणानंतर बनवले Video; मित्रानेच केला गेम…
कोल्हापूर! मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर केला लैंगिक अत्याचार…
कोल्हापूर! प्रेमी युगुलाची घनदाट जंगलात गळफास लावून आत्महत्या…
कोल्हापूर! ग्रुपवर केलेल्या कमेंटच्या रागातून एकाला भरदिवसा संपवले…
कोल्हापूर! शिक्षकाला महिलेच्या घरात रंगेहाथ पकडले अन्…

