शिरूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या धडाकेबाज कारवाया…

शिरूर (नितीन थोरात): पुणे जिल्ह्यातील शिरूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक म्हणून संदेश केंजळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच धडाकेबाज कारवायांची मालिका सुरू केली आहे. गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेत विविध अवैध धंद्यांवर कारवाई करत कायदा व सुव्यवस्था राखण्यावर भर दिला आहे.

पोलिस निरीक्षक केंजळे यांनी पदभार स्वीकारताच परिसरातील अवैध दारू विक्री, जुगार अड्डे, संशयित गुन्हेगारांची हालचाल, तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली. या मोहिमेदरम्यान अनेक ठिकाणी छापे टाकून कारवाई करण्यात आली असून, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. यासोबतच रात्रीची गस्त वाढविण्यात आली असून, महामार्ग आणि संवेदनशील भागांमध्ये नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे. त्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण येण्यास मदत होत असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी स्थानिक नागरिक, व्यापारी आणि ग्रामस्थांशी संवाद साधत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्याचे आवाहन केले आहे. कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असेही त्यांनी सांगितले. शिरूर शहर व तालुक्यातील नागरिकांनी नव्या पोलिस निरीक्षकांच्या धडाकेबाज कारवायांचे स्वागत केले असून, पुढील काळातही गुन्हेगारीविरोधातील मोहीम कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी २०२४-२५ व २०२५२६ केलेल्या महत्त्वाच्या कारवाया पुढीलप्रमाणे…
१) अवैध्य अग्नीशस्त्रांविरोधात शोधमोहीम व कार्यवाही…
शिरूर पोलिस ठाणे हददीतील अवैध्य अग्नीशस्त्रांचे अनुशंगाने गोपनिय बातमीदार नेमूण केलेल्या कार्यवाहीमध्ये सुमारे १६ अवैध्य अग्नीशस्त्रे ( गावठी पिस्तुले ) व २३ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असुन उपरोक्त प्रकरणांमध्ये २३ आरोपीतांना अटक करण्यात आली आहे. तसेच अदयापही अवैध्य अग्नीशस्त्राचे सखोल शोधमोहीम चालु आहे.

२) अवैध्य दारू वाहतुक व विकी व गावठी दारू निर्मीतीवर केलेली कार्यवाही…
शिरूर पोलिस ठाणे हददतील अवैध्य दारू विक्री व वाहतुक तसेच गावठी हातभटटी निर्मीतीचे वेळोवेळी धडक व कठोर कार्यवाही करून १३४ केसेस करून एकुण १२७ आरोपीतांवर कार्यवाही करून सुमारे ७८ लाख रू किमतीचा मुददेमाल त्यामध्ये गावठी दारू बनविण्यासाठी लागणारे रसायण, गावठी दारू तसेच अवैध्य देशी विदेशी दारू असा मुददेमाल जप्त करण्यात आला असुन काही मुददेमाल नाशवंत असल्याने नाश करण्यात आलेला आहे.

३) अमली पदार्थावरील कार्यवाही…
शिरूर पोलिस ठाणे हददीत गोपनिय बातमीदांराचे आधारे अमलीपदार्थ गांजा एकुण ८ कैसेस त्यामध्ये ३,१४०००रू चा अमलीपदार्थ गांजा जप्त करण्यात आला असुन १३ आरोपीतांवर कारवाई करून अटक करण्यात आले असुन अवैध्य गुठख्यावर एकुण ८ केसेस त्यामध्ये २१ लाख ६८,०००हजार रू चा मुददेमाल जप्त करून ९ आरोपीतांवर कारवाई करण्यात आली असुन तसेच एम.डी इग्स चे ५ केसेस करून त्यामध्ये सुमारे २१ कोटी रूपयांचे एम.डी इग्स जप्त करून १० आरोपीतांवर कारवाई करण्यात आली आहे. इग्स विरोधात सखोल शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे.

४) पोलिस ठाणे हददीतील (मिनीमोक्का अंतर्गत ) संघटीत गुन्हेगारी टोळयांवरील कार्यवाही…
शिरूर पोलिस ठाणे हददीत वांरवार गुन्हे केलेल्या गुन्हेगारी टोळयांवर संघटीत गुन्हेगारी व किरकोळ संघटीत गुन्हेगारी कायदया अंर्तगत आंबळे येथील दरोडा प्रकरणात पकडलेल्या टोळीवर संघटीत गुन्हेगारी अंतर्गत भारतीय न्याय संहीता कलम १११ कलम वाढ करून कार्यवाही करण्यात आली असुन किरकोळ संघटीत गुन्हेगारीचे अनुशंगाने शिरूर शहरातील वारंवार जुगार चालविणारे हबीब सय्यद टोळीवर व बियर शॉपी फोडुन चोरी करणारे टोळीवर भारतीय न्याय संहीता कलम ११२ कलम वाढ करून कार्यवाही करण्यात आली आहे.

५) पोलिस ठाणे रेकॉर्डवरील सकीय गुंड / सराईत गुन्हेगार यांचेवर एम.पी. डी. ए. कायदया अंतर्गत स्थानबध्दता / अटक तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ५५ प्रमाणे टोळयांची पांगापाग तसेच कलम ५६ प्रमाणे व्यक्तीश गुन्हेगारांची तडीपार / हददपार व इतर प्रतिबंधक कार्यवाही…
शिरूर पोलिस ठाणे रेकॉर्डवरील शरीराविरूध्द गुन्हेगार, खंडणी मागणारे, अवैध्य रित्या गावठी पिस्तुले बाळगणारे, शेतक-यांचे इलेक्ट्रीक शेतीपंप चोरणारे, विदयुत रोहीत्र चोरणारी अशा दोन टोळयांमधील ७ इसमांवर महाराष्ट्र पोलिस अधिनियम ५५ प्रमाणे टोळयांची पांगापांग करणे अनुशंगाने २ वर्षाकरीता मा. पोलिस अधिक्षक साो. पुणे ग्रामीण यांचे करवी पुणे जिल्हयातुन व अहील्यानगर जिल्हयातील पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातुन हददपार करण्यात आले असुन रेकॉर्डवरील व सक्रीय गुन्हेगार भांडणे करणे, मारामारी करणे, खंडणी मागणे, बेकायदेशिर हत्यारे बाळगणे असे एकुण ९ इसमांना मा. प्रांत अधिकारी साो. पुणे यांचेकरवी महाराष्ट्र पोलिस अधिनियम ५६ प्रमाणे २ वर्ष कालावधीकरीता पुणे जिल्हयातुन व अहील्यानगर जिल्हयातील पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातुन हददपार करण्यात आले असुन ७ रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा चालु आहे. तसेच इतर रेकॉर्डवरील व इतर दखलपात्र व अदखलपात्र गुन्हे दाखल असणारे अशा एकुण ४,७७५ गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे इसमांवर भारतीय नागरीक सुरक्षा संहीता १२६ प्रमाणे १२९ प्रमाणे १६३ प्रमाणे तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम ९३ प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.

६) शिरूर पोलिस ठाणे हददीतील ब्लॅक फिल्मींग वाहने, विना नंबरप्लेट / फॅन्सी नंबरप्लेट वाहने इतर वाहतुक केसेस व दंड कार्यवाही व बुलेट सायलेन्सरील बुलडोजर कारवाई…
शिरूर पोलिस ठाणे हददीतील नागरीकांचे सुरक्षेतेचे अनुशंगाने व वाहतुकीचे शिस्तीचे अनुशंगाने शिरूर शहर व परीसरात वावरणारे व ब्लॅक फिल्मींग केलेल्या अशा १२४ कारवर मोटार वाहन कायदया अंतर्गत कारवाई करून १ लाख ४० हजार रू दंड वसुल करण्यात आला त्याच बरोबर बुलेट सायलेन्सर मधुन र्ककश आवाज काढणारे ६८ बुलेटवर ६८ हजार रू दंड करण्यात आला असुन ३५ बुलेटचे सायलेन्सर रोड रोलर फिरवुन नाश करण्यात आले आहे. तसेच फॅन्सीनंबर प्लेट लावणारे एकुण १६५३ वाहनांवर मोटर वाहन कायदयाअंतर्गत कार्यवाही करून ८ लाख ६५ हजार रू दंड करण्यात आला आहे. इतर वाहतुकीचे नियम न पाळणा-यांवर एकुण १० ६८९ वाहनांवर कारवाई करून १ कोटी १८ लाख रू दंड करण्यात आला आहे. अशी एकुण १९ कोटी ४५ लाख ८२ हजार दंडात्मक व भरीव कारवाई करण्यात आली आहे.

शिरूर येथून अपहरण केलेल्या चिमुकलीची मुंबईतून सुखरूप सुटका…

पुणे जिल्ह्यात मित्राचा पैशासाठी केला खून; आरोपी तासाच्या आत ताब्यात…

रांजणगाव तिहेरी हत्याकांडाचं गूढ उलगडलं! दाजीच्या भावासोबत प्रेमसंबंध जुळलं अन्…

आरोपी दत्ता गाडे याला पकडण्याचे श्रेय घेण्यासाठी सगळेच पुढे; पण खरं पकडलं कोणी पाहा…

Video: पुणे ग्रामीण पोलिस दलाची दमदार कामगिरी…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!