नाशिक! महिला पोलिस आयटी कर्मचाऱ्यांच्या वेशात गेल्या अन् केला भांडाफोड…

नाशिक : एका नामांकित मल्टिनॅशनल आयटी (IT) कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रयत्नाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. या प्रकरणात नाशिक पोलिसांनी महिला अधिकाऱ्यांच्या मदतीने वेशांतर करून या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

संबंधित प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि कॉर्पोरेट क्षेत्राशी संबंधित असल्याने नाशिक पोलिसांनी गोपनीयता पाळली. संशयित आरोपी मीटिंगच्या नावाखाली महिलांशी अश्लील वर्तन करत असल्याची माहिती मिळताच, महिला वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि सात महिला कर्मचाऱ्यांच्या पथकाने कंपनीत वेशांतर करून प्रवेश केला. या पथकाने प्रत्यक्ष कंपनीत वावरत असताना संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवले. मीटिंग दरम्यान होणारे अश्लील हावभाव आणि गैरवर्तन पोलिसांनी स्वतः डोळ्यांनी पाहिले. सुमारे 40 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून ठोस पुरावे गोळा केल्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

पोलिसांच्या तपासात समोर आलेली माहिती धक्कादायक आहे. नोकरीच्या मुलाखतीपासूनच युवतींना लक्ष्य केले जायचे. एका पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, सुट्टीच्या दिवशी तिला एका रिसॉर्टवर नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. केवळ महिलांचे शोषणच नाही, तर एका पुरुष कर्मचाऱ्याला देखील धर्मांतरासाठी भाग पाडण्यात आल्याचे उघड झाले आहे. कामाच्या ठिकाणी विशिष्ट धर्माबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करून कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण केले जात होते. या प्रकरणात आतापर्यंत मुंबई नाका पोलिस ठाण्यात 9 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी या रॅकेटमधील पाच मुख्य संशयितांना अटक केली आहे

1. आसिफ अन्सारी
2. शफी शेख
3. शाहरुख कुरेशी
4. रझा मेमन
5. तौसिफ अत्तार

न्यायालयाने या पाचही आरोपींना 10 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, अशोक खरात आणि रवींद्र एरंडेनंतर नाशिकमध्ये हे तिसरे मोठे प्रकरण समोर आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

नाशिक! बड्या IT कंपनीत नोकरी द्यायचे, मग रिसॉर्टवर नेऊन करायचे अत्याचार…

अशोक खरात प्रकरणातील व्हिडिओंबाबत आला नवा ट्विस्ट…

नाशिक! भोंदूबाबा अशोक खरात याच्या केबिनच्या काचा पाहून पोलिस थक्क…

नाशिक! प्रसिद्ध डॉ. मनिषा जेजुरकर आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट…

नाशिक! पत्नी अन् प्रियकराने गोड बोलून संपवलं; अखेर गूढ समोर…

नाशिक जिल्ह्यातील युवतीच्या खुनाचा गुन्हा काही तासांतच उघड; प्रेमसंबंधातून हत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!